शिकाल तर टिकाल!
कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचे आवहन
✒️भीमराव काळे
पालघर : खेळभावनेतून शारीरिक मजबुती तसेच खेळ वृत्ती निर्माण करून खेळाडू निर्माण व्हावेत. सध्याच्या घडीला संस्कार आणि शिक्षण गरजेचे आहे. जो शिकेल, तोच टिकेल यासाठी प्रत्येकाने उच्च शिक्षण घेऊन कुटुंबासह समाजाचाही विकास करावा. जनता आणि पोलीस यांच्यामध्ये कायम सुसंवाद असावा, असे आवाहन कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (Special Inspector General of Police of Konkan Region Sanjay Darade) यांनी केले.
जनसंवाद अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी चांगला सुसंवाद व समन्वयासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये शांतता च सुरक्षा टिकून राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेव पाटील यांच्या संकल्पनेतून "जन संवाद अभियान" राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२५ रोजी तलासरी पोलीस ठाणे आणि तलासरी इंडस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ठक्करबाप्पा विदयालयाच्या मैदानात करण्यात आले. त्यावेळी दराडे यांनी जनतेला मोलाचे मार्गदर्शन केले.
आमदार विनोद निकोलेही सहभागी
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पालघर, वसई, विरार, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यातील एकुण १६ संघानी सहभाग घेतला होता. या जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी खेळांत प्रत्यक्ष सहभाग घेऊन प्रतीस्पर्धी संघावर चढाई केली आणि खेळात रंगत आणली.
स्पर्धेत यांनी मारली बाजी
१) प्रथम क्रमांक शिवशंभो बोईसर,
२) व्दितीय क्रमांक कुर्लाई क्रिडा मंडळ, सफाळे
३) तृतीय क्रमांक आई गावदेवी डहाणू
४) चतुर्थ क्रमांक जरीमाता धाकटी डहाणू
विजेत्यांचा सन्मान!
विजयी संघांना चषक व रोख रक्कम देण्यात आली. यावेळी
अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, आमदार विनोद निकोले, पंचायत समिती तलासरी उपसभापती नंदुकुमार हाडळ, तलासरी तालुका इंडस्ट्रिज असोसिएशन अध्यक्ष अजित नार्वेकर, प्रा. डॉ. भगवान राजपुत, गोदावरी कॉलेज प्राचार्य, गोविंद गावित, तलासरी तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सुरेश भोये, तलासरी नगरपंचायत नगराध्यक्ष सुभाष दुमाडा, तलासरी नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
👇खालील बातमीही वाचा👇