कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर
✒️उदय आठल्ये
सातारा : सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
आतापर्यंत बजावलेले कर्तव्य
१. गडचिरोली, चंद्रपूर या नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कर्तव्य बजावले.
२. नागपूर शहरात मोक्का आणि एमपीडीए कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटवले.
३. २०२० मध्ये कोरोना संकट काळात कडक अंमलबजावणी करून मानव सेवा केली.
४. कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय संघर्ष/हिंसाचार, मराठा आरक्षणविषयक आंदोलनादरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी जातीय सलोखा राखत सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून शांततापूर्ण वातावरण ठेवले.
५. सामाजिक (Community) पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा (S.E.V.A.) प्रकल्पासारख्या नाविन्यपूर्ण योजना दुर्बल घटकांच्या मदतीसाठी राबविल्या.
६. कोल्हापूर शहरातील दंगल, विशाळगड अतिक्रमण, पुसेसावळी आँध दंगल आदी दंगलसदृश्य परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती हाताळून कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवली. जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. परिणामी मिरज, कराड, बार्शी, अक्कलकोट, जुन्नर, दौंड, खेड, आँध या पूर्ण भागात शांतता कायम राहिली.
७. नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक येथे कार्यरत असतांना गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचे कौशल्यपूर्ण कामकाज वाखाणण्याजोगे आहे. मोहल्ला समिती, शांतता समिती या माध्यमांद्वारे सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवली.
८. लोकसभा/विधानसभा निवडणुकांच्या वेळी काटेकोरपणे निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी केली. कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे. समन्वय ठेवून वसीमावर्ती भागात तपासणी करून निवडणुक कालावधीत कोणतीही अघटीत घटना घडणार नाही याकरीता मार्गदर्शन केले.
९. पोलिसां प्रति सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कम्युनिटी पोलिसिंग योजना राबवून सर्व सण / समारंभ उत्सव शांततेत व उत्साहात साजरे झाले.
१०. अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी, मंडळांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन गणपती, ईददरम्यान सलोख्याचे वातावरण निर्माण केले. नवरात्रोत्सव, भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन, पंढरपूर वारी, लोकसभा/विधानसभा निवडणुक २०२४, मा. पंतप्रधान/राष्ट्रपती व इतर व्हिव्हिआयपींचे दौरे यांचेसाठी सुरक्षा व संरक्षण व्यवस्था नियोजन चोख व्यवस्थापन.
११. मोर्चा, विविध आंदोलने यामध्ये सामाजिक सलोखा राखणेसाठी मोहल्ला समिती, शांतता कमिटी, महिला दक्षता समिती अशा विविध समित्यांच्या बैठका घेवून जनतेचा विश्वास वृध्दींगत केला. भयमुक्त वातावरण निर्माण करणेसाठी प्रयत्न केले.
१२. वन्यजीव गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी करणाऱ्या टोळींचा छडा लावून अंदाजे ४५ कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त केला.
१३. परिक्षेत्रात शरिरविषयक, मालाविरूद्ध, महिलांवरील अत्याचार, संपत्तीविषयक व आर्थिक विषयक गुन्हयांना आळा घालण्यासाठी Visible पोलिसिंग, स्ट्रीट पेट्रोलिंग, रात्रग्रस्त व नाकाबंदी यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सतत राबविल्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसविली.
१४. पुणे शहरात आर्थिक गुन्हे शाखा व सायबर लॅब स्थापन करूनआर्थिक व सायबर सुरक्षा वाढवली.
१५. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक/पोलीस उपअधीक्षक/परिविक्षाधीन भापोसे अधिका यांचे दर्जेदार प्रशिक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
१६. राज्य राखीव पोलीस दलात कर्मचा-यांसाठी शस्त्र तपासणी, शस्त्रास्त्र साठा, निशाणेबाजी व क्रिडा कौशल्य विकासाकरीता योग्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले व योगदान दिले, त्यांचे कार्यकाळातील या भरीव योगदानामुळे राज्य राखीव पोलीस दलाला विजेता ट्रॉफी व चॅम्पीयनशीप देवून गौरविण्यात आले
१७. मोटार परिवहन विभागात जुन्या वाहनांचे निर्लेखन, वाहनचालकांसाठी वाहन देखभाल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, कार्यशाळा नुतनीकरण, अशी वैविध्यपूर्ण कौशल्य विकासासाठी कामगिरी करून मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण व संपूर्ण मोटार परिवहन वाहतूक विभागाचे कामकाज गतीमान केले.
१८. कोल्हापूर परिक्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून २०२४ साठी घोषित झाले.
१९. कोल्हापूर, पुणे परिक्षेत्रामधील नवीन पोलीस ठाणे, निवासी इमारती यांची उभारणी करणे, पोलीस अधिकारी व कुटुंबीय यांचे कल्याणासाठी उपाय, मानसिक ताण-तणाव हाताळणीचे उपाय, कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देणे यासाठी सातत्याने कार्य केले आहे.
२०. सुनील फुलारी यांचे पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा पोलीस विभागातील नावलौकिक आहे.
२१. सुनील फुलारी यांनी पोलिसिंगरीता कौशल्यपूर्ण, वैशिष्टपूर्ण योगदान सातत्याने दिले आहे.
- आतापर्यंत केलेल्या कर्तव्याची दखल घेत राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पोलीस वार्ताच्या टीमच्या हार्दीक शुभेच्छा!