Site icon police varta

Six people arrested for possessing marijuana in Pune

पुण्यात गांजा बाळगणाऱ्या सहा जणांना अटक;
हवालदार मिलिंद देवरेंची उल्लेखनिय कामगिरी

पुणे : गांजा घेऊन आलेल्या ६ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई हवालदार मिलिंद देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शिकापुर पोलीसांनी केली. या कारवाईत ६ जणांना अटक करून ५ लाख ६ हजार ७४० रुपयांचा ५३.०६५ किलो ग्रॅम गांजा व २ कार असा एकूण १९ लाख ६० हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केल्या. त्यानुसार शिकरापूर पोलीस ठाण्याचे पथक गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर लक्ष ठेवू लागले. पोलिसांची विशेष शोधमोहीम सुरू असताना पोलिसांना आरोपींची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार तळेगाव ढमढेरे ते कासारी फाटा येथे २ स्कॉर्पीओ कारमधून आलेल्या वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे, राहासनापुर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर), स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर (वय २२ वर्षे, राएकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर), शुभम बंडु जवरे, (वय २१ वर्षे, रा.वाडगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर), तुषार रामनाथ जवरे (वय २१ वर्षे, रावाडगाव, ता. शेवगाव, जि.अहिल्यानगर), अक्षय कांतीलाल आव्हाड (वय २६ वर्षे, रानायरा पंप रोड, करमाळा रोड, राशीन, ता.कर्जत, जि. अहिल्यानगर), हर्षद देविदास खेडकर (वय २० वर्षे, राएकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करीत आहेत.

ही कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक, संदीप साळुंखे सपोलीस निरीक्षक, महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सपोउपनि शंकर साळुंके, लहानू बांगर, हवालदार नवनाथ नाईकडे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, मिलींद देवरे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांनी केली.

Exit mobile version