पोलीस अंमलदार सागर शेडगे, राहुल ओलेकर यांची उत्तम कामगिरी
सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केल्या १४ सायकल्स
- पुणे : पुण्यातील विविध भागात सायकल चोरणाºया सुशिक्षित बंटी-बबलीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अंमलदार सागर शेडगे व राहुल ओलेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलीस दलाच्या सिंहगड रोड पोलिसांनी केली. या कारवाईत १४ महागड्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारे गुन्ह्याची उकल
६ आॅगस्ट २०२३ रोजी सायंकाळ ६ वाजण्याच्या सुमारास मंदार अपार्टमेंट फ्लॅट नं ८ आनंदनगर, अभिनव चिल्ड्रेन स्कूल समोरील पार्किंगमधून महागडी सायकल चोरांनी पळवली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपास करताना सिंहगड रोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे मागोवा घेतला. तपासादरम्यान, २६ आॅक्टोबर २०२३ रोजी तपासी पोलिस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वडगाव ब्रिजजवळ दुचाकीवरून एक व्यक्ती व त्याच्या पाठीमागे बसलेली महिला सायकल घेवून जात होते. त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे विजय राजेंद्र पाठक (वय ३६, रा. सध्या प्लॅट नं आय १०३, क्लोअर कासाब्लांका, तळेगाव, पुणे. मुळ पत्ता-राक्रिश अपाटर्मेट प्लॅट नं-२०१, नवरेनगर, डिबॉन रोड अंबरनाथ (इस्ट) ठाणे) व त्याच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचे नाव विचारता तिने तिचे नाव व पत्ता डायना डेंझिल डिसोजा (वय २५ वर्षे रा.प्लॅट नं आय-१०३ क्लोअर कासाब्लांका तळेगाव पुणे) असे असल्याचे सांगितले. सोबत असलेल्या सायकलची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसी खाक्यात दाखवताच त्यांनी महागड्या सायकली चोरत असल्याचे सांगितले. त्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
मौजमजेसाठी चोरल्या साडेतीन लाखांच्या सायकल…
कोेठडीत असताना पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी दाम्पत्याने मौजमजा करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपयांच्या सायकल चोरल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहे.
यांनी केली कारवाई….
ही कारवाई पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, एसीपी अप्पासाहेब शेवाळे, वपोनि अप्पासाहेब शेवाळे, पोनि (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन निकम, पोउपनि गणेश मोकाशी, अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांनी केली.