police varata

Satara Police: Two arrested for selling illegal weapons, goods worth lakhs seized

अवैध शस्त्र विक्री करणारे दोघे जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

सातारा गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

✒️उदय आठल्ये (पोलीस मित्र)

सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी कारवाई करत अवैध शस्त्र विकणाऱ्या दोन जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 95 हजार 500 रुपयांच्या दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला

सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीप्रमाणे, कराड तालुक्यातील वाठार परिसरातील नवनाथ महाराज मठासमोर दोन इसम पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून सापळा रचण्यात आला. बातमीतील वर्णनानुसार आलेल्या मोटारसायकलवरील दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान, त्यांच्या ताब्यातून दोन देशी पिस्टल, दोन मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली.

#Satara_Police #Illegal_Weapon #Criminal_Investigation #Pistol_Seizure #Satara_Crime_Branch
#सातारा_पोलिस #अवैध_शस्त्र #गुन्हेगारी_तपास #पिस्टल_जप्त #सातारा_गुन्हे_शाखा

गुन्ह्याची नोंद

अटक केलेल्या आरोपींवर कराड तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 3(1), 25 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईने सातारा जिल्ह्यातील अवैध शस्त्र तस्करीला मोठा धक्का बसला आहे.

सातारा पोलिसांचे यशस्वी अभियान

सातारा पोलीस दलाने नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत 106 देशी बनावटीच्या पिस्टल, 4 बारा बोअर बंदुका, 233 जिवंत काडतुसे, 383 रिकाम्या पुंगळ्या, आणि 4 मॅगझिन जप्त करून अवैध शस्त्र तस्करीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे.

पोलिसांचे अभिनंदन

या यशस्वी कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, साक्षात्कार पाटील, पोलीस अंमलदार शिवाजी गुरव, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रवीराज वर्णकर तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील सज्जन जगताप, उत्तम कोळी, मोहित गुरव यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कौतुक करून पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!