police varata

Satara crime News : Gutkha worth 10 lakhs brought from Karnataka seized

कर्नाटकातून आणलेला १० लाखांचा गुटखा जप्त
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसलेंची कौतुकास्पद कारवाई

उदय आठल्ये
सातारा : कर्नाटक राज्यातून आणलेला १० लाख ३० हजारांचा गुटखा व टेम्पो असा १५ लाख ४१ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कौतुकास्पद कारवाई तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण भोसले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली.


कर्नाटकच्या निपाणी येथून पांढरे रंगाचा बोलेरो टेम्पोतून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती किरण भोसले यांना खबऱ्याने दिली. त्यानुसार तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ तासवडे टोलनाका येथे नाकाबंदी केली. कराडकडून आलेला टेम्पो पोलिसांनी अडवला. चालकाची चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव विकास वसंत जाधव (वय ३५ वर्षे रा. गणेश चौक कोडोली, सातारा) असे सांगितले. चौकशीदरम्यान पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात गुटखा आळला. या प्रकरणी तळबीड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी विकास जाधव याला २६ डिंसेंबरला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक कडुकर मॅडम, कराडचे उप विभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले, मोरे, सपोउपनि खराडे, हवालदार सांळुखे, शहाजी पाटील, अंमलदार सुशांत कुंभार, प्रविण गायकवाड, अभय मोरे, गणेश राठोड, निलेश विभूते, रत्ना कुंभार यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!