police varata

Satara Crime Detection Police

रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या
वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

उदय आठल्ये
सातारा : रिव्हॉल्व्हर व देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. राजेश शंकर सणस असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ विदेशी बनावटीचे रिव्हॉलवर व १ देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.


१६ जानेवारी २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि पोलीस उप अधिक्षक श्याम पानेगावकर यांना खबऱ्याने शस्त्र बाळगणाऱ्याची माहिती दिली. त्यानुसार वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मौजे एकसर गावाचे बसस्थानकाचे परिसरात सापळा लावण्यात आला. त्यावेळी एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचालीवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व रिव्हॉल्व्हर आढळले. शस्त्र बाळगल्या प्रकरणी राजेश शंकर सणस याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्याम पानेगांवकर, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, हवालदार अजित जाधव, पोलीस अंमलदार नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड, धिरज नेवसे, विशाल शिंदे यांनी केली. म

आतापर्यंत १०९ पिस्टल जप्त

सातारा जिल्हा पोलिसांनी नोव्हेंबर २०२२ पासुन ते आज अखेर १०९ देशी बनावटीची पिस्टल ४ वारा बोअर बंदुका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या व ४ मॅग्झीन जप्त करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!