Site icon police varta

Salute to the brave duty of IPS Nurul Hasan!

रक्ताच्या बदल्यात रक्ताची मागणी करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवणाऱ्या आयपीएस नुरुल हसन यांच्या धाडसी कर्तव्याला सलाम!

✒️उदय आठल्ये

भंडारा : पोलीस अधीक्षक आयपीएस नूरूल हसन यांनी सुरुवातीला संयमी भूमिका घेतली. परंतु जमाव आक्रमक होताच नूरूल हसन देखील आक्रमक झाले व जमावाला कायदा हातात घेऊन दिला नाही.

‘रक्तासाठी रक्त!’ संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. २ हजार ५०० हून अधिक संतप्त लोक मानवभक्षक वाघाच्या मृत्यूची मागणी करत होते. अवघ्या १० फूट अंतरावर एका भयंकर वाघाने महिलेच्या मृतदेहाची चिरफाड केल्याने जमावाचा राग अनावर झाला. मात्र, त्यावेळी इच्छाशक्ती, कणखर नेतृत्व करत आयपीएस नूरूल हसन यांनी जमावावर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवली. पोलीस आणि वनविभागाच्या सुनियोजित कारवाईत हा मानवभक्षक वाघ बेशुद्ध झाला. मात्र या संपूर्ण घटनेत एसपी नूरुल हसन यांची निर्णायक भूमिका आणि धैर्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे मोठा अनर्थ टळल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. अशा निर्भीड नेतृत्वाला ‘पोलीस वार्ता’चा सलाम!

Exit mobile version