१७३ मोबाईल, १७ मोटारसायकल, ४ चारचाकी, सोने-चांदीची दागिने जप्त
८६ लाखांच्या मुद्देमालाचे हस्तांतरण करणाऱ्या पालघर पोलिसांना सलाम!
✒️ भीमराव काळे
पालघर : २०२३ व २०२४ या वर्षामध्ये पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील १७३ मोबाईल, १७ मोटारसायकल, ४ चारचाकी वाहने, सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २ कोटी २ हजार २३८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्यापैकी न्यायालयाच्या आदेशानुसार ८६ लाख १० हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते १८ नागरिकांना परत करण्यात आला.
या गुन्ह्यांचा तपास पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, अंमलदारांनी केला.