police varata

Road safety lessons for students in Mira Road

मिरा रोडमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम

✒️भीमराव काळे
मिरा रोड : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत २३ जानेवारी रोजी काशिमीरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सागर इंगोले यांनी मिरा रोड येथील सेवन इलेव्हन स्कूल, पोतदार इंटरनॅशनल स्कूल, जे.पी. इंफ्रा रोड या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूकीवर प्रबोधन करणारी चित्रफीत दाखवून मार्गदर्शन केले.

तसेच स्कूल बसचालक व त्यांच्या सहकार्यांनाही मुलांच्या देखभालीबाबत सूचना दिल्या. या कार्यक्रमात १२० विद्यार्थी, बसचालक व त्यांचे सहकाकी रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!