police varata

Pune Crime Branch Unit 6


मुंबईतील दरोड्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला पिस्तूलसह ठोकल्या बेड्या

पुणे गुन्हे शाखा युनिट ६ चे हवालदार बाळासाहेब सकटे, पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले यांच्यामुळे आरोपी लागला हाती

Police varta News Network
पुणे : मुंबईतील दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई
हवालदार बाळासाहेब सकटे, पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखा युनिट ६ ने केली. या कारवाई पिस्तूल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने वरिष्ठांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, सराईत आरोपी यांच्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे पोलीस दलाचे गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट ६ चे पथक आरोपींवर व गैरधंद्यांवर लक्ष ठेवू लागले. पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना हवालदार बाळासाहेब सकटे, पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले यांना खबऱ्याने पिस्तूल बाळगणाऱ्यी सराईत गुन्हेगाराची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे युनिट ६ च्या पथकाने सापळा लावून साहिल राजु शेख (वय २४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा.३८ मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग, फ्लॅट नं. १२०६, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे) याच्या कॅफे बन मस्का, कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथे मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळल्या. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात (गु.र.नं.१२४३/२०२४) आर्म अॅक्ट कलम ३.२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३११ (१) (अ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा आरोपी व्ही. पी. रोड पोलीस ठाणे, मुंबई गु.र.नं.२९७/२०२२, कलम ३९४, ३९५, ३९७, ५०६(२), १२० (ब) भा.द.वि. प्रमाणे दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासुन फरार असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट ६ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, पोलीस नाईक नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, अंमलदार ऋषीकेश ताकवणे सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, हवालदार सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!