वरळीतील जांभोरी मैदान येथून झाले होते अपहरण
मुंबई : मुंबई पोलिसांचा दूरदृष्टीकोन कायम चर्चेत राहिला आहे. गुन्ह्याची उकल असो वा कायदा व सुव्यवस्था राखणे असो… पोलिस नेहमीच यशस्वी ठरले आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा हवालदार प्रल्हाद परीट यांच्यामुळे पहावयास मिळाला. वरळीतील जांभोरी मैदान येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती भेटली नाही. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले पण तिचा शोध लागला नाही. या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच परीट यांनी आपल्या राहत्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्या मुलीला एक व्यक्ती पळून नेताना दिसून आला. त्या फुटेच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला.
या गुन्ह्याची उकल होण्यात परीट यांनी दूरदृष्टीकोनातून घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा उपयोगी ठरला. याची दखल घेत वरळीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र काटकर यांनी प्रल्हाद परीट यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
हवालदार प्रल्हाद परीट यांच्या सर्तकतेला ‘पोलीसवार्ता’ टीमचा सलाम!