police varata

Police force lost ‘Viru’।पोलीस दलाने गमावला ‘विरू’

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पोलीस दलात प्रत्येक जण आपापल्या परीने कर्तव्य बजावण्यासाठी सतर्क असतो. हरएक विभाग कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी खंबीरपणे कार्यरत असतात. असाच कर्तव्यदक्ष असलेला जळगाव जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथकातील वीरू या श्वानाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. तो गेल्या ६ वर्षांपासून जिल्हा पोलीस दलात कर्तव्य बजावत होता. त्याला निमोनिया झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जळगाव पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात वीरू याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वृत्त समजताच जळगावसह राज्यातील प्रत्येक पोलीस दलातर्फे शोक व्यक्त करण्यात आला.
विरूने आजवर बजावलेल्या कर्तव्याची पोलीस दलाच्या इतिहासात नोंद झाली असून कायम स्मरणी राहतील.
विरूला “पोलीसवार्ता”च्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

One thought on “Police force lost ‘Viru’।पोलीस दलाने गमावला ‘विरू’

  1. श्वाणा सारखा प्रामाणिक प्राणी कोणीही नाही, त्यात पोलीस श्वान असेल तर पोलिसांच्या तपासात मदत तसेच स्फोटक असतील तर तो शोधून काढणारच..पोलीस श्वान विरु यास भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!