- पिंपरी चिंचवड : १२० मोबाईल बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेशातून जप्त
- हवालदार शहाजी धायगुडे, अंमलदार कौंतेय खराडे, प्रमोद गायके यांची उत्तम कामगिरी
✒️उदय आठल्ये (पोलीस मित्र)
पुणे : महाराष्ट्रासह अन्य राज्यातून गहाळ, चोरलेले १२० मोबाईल बिहार, कर्नाटक, रावस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेशातून जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police) हवालदार शहाजी धायगुडे, अंमलदार कौंतेय खराडे, प्रमोद गायके यांना केली.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड परिसरातून अनेकांचे मोबाईल चोरीला व गहाळ झाले होते. याचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, आणि अपर आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली.
विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त (परिसर २) आणि सुनिल कुराडे, सहायक पोलीस आयुक्त (वाकड विभाग) यांच्या नेतृत्वाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपासासाठी विशेष पथक नेमले. या पथकातील हवालदार शहाजी धायगुडे, अंमलदार कौंतेय खराडे, प्रमोद गायके यांनी सीईआयआर (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आणि इतर राज्यांमधील (बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आणि मध्य प्रदेश) मोबाईल जप्त करण्यात आले.
हरवलेले मोबाईल ज्या व्यक्तींकडे सापडले, त्यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर कृत्याची आठवण करून मोबाईल परत मागवण्यात आले. काही प्रकरणांत पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन मोबाईल जप्त केले. या यशस्वी मोहिमेमुळे पोलिसांबद्दल जनतेत समाधान आणि विश्वास निर्माण झाला आहे.
नागरिकांचे समाधान आणि कृतज्ञता
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “आमच्या समस्यांना गंभीरतेने घेतले आणि मोबाईल परत मिळवून दिले,” असे नागरिकांनी समाधानाने सांगितले.
वाकड पोलिसांना सलाम!
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशीकांत महानवर, अपर पोलीस अयुक्त, वसंत परदेशी, उपायुक्त, विशाल गायकवाड, एसीपी सुनिल कुराडे, वरिष्ठ प्लीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणाऱ्या हवालदार शहाजी थायगुडे, अंमलदार कौंतेय खराडे, प्रमोद गायके यांना ‘पोलीस वार्ता’चा सलाम!