police varata

One killed in Narayangaon over dispute over Rs 100

नारायणगावमध्ये शंभर रुपयांच्या वादातून एकाची हत्या

पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शंभर रुपयांच्या वादातून एका व्यक्तीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

कशी घडली घटना?
मयत बाळू महादेव पोखरकर (वय 41, रा. खोडद, पोखरकर मळा, जुन्नर) यांनी आरोपी राहुल भाऊसाहेब गुळवे (वय 32, रा. शिपलापुर पानोडी, संगमनेर, सध्या रा. बाजारतळ, नारायणगाव) याला मागील आठवड्यात दारू पिण्यासाठी शंभर रुपये उसने दिले होते. पैसे वेळेत परत न मिळाल्याने बाळू यांनी आरोपीला वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली. परिणामी 13 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजता, नारायणगाव येथील यात्रा मैदानावर आरोपीने बाळू याला बोलावून नेले. रागाच्या भरात आरोपीने लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यावर हल्ला करत त्यांचा निर्घृण खून केला.

पोलिसांची तत्परता आणि आरोपीला अटक
सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षांवरून आरोपी राहुल गुळवे याला 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:09 वाजता अटक करण्यात आली.

तपास सुरू
नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक शेटे आणि तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करत पुरावे गोळा केले आहेत.

गुन्हा दाखल:
सदर प्रकरणी भा.दं.वि. कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

गुन्ह्याची पार्श्वभूमी:
केवळ शंभर रुपयांच्या वादातून मित्राचा जीव घेतल्याची घटना समाजाला हादरवणारी आहे. मित्रत्वाचे नाते सांभाळण्याऐवजी रागाच्या भरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!