police varata

Mumbai’s Trombay police busted a case of two-wheeler theft in Mumbai

मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिसांमुळे मुंब्र्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा उघड

मुंबई : सराईत आरोपी मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिसांच्या हाती लागल्याने दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. एक गुन्हा घरफोडीचा तर दुसरा मुंब्र्यातील दुचाकी चोरीचा! या कारवाईत २ हजारांची रोकड व चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
तस्मिया अन्वर शेख या ट्रॉम्बेतील चिता कॅम्प परिसरात राहतात. त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा पाहून चोरट्याने आत शिरून २० हजारांची रोकड पळविली. या प्रकरणी (गु.र.क्र. 588/2023, कलम 380 भा. दं. वी.) अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पो.उपनिरीक्षक नाणेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या माहितीच्या ट्रॉम्बे बस टर्मिनल येथे सापळा लावून फहाद मोहम्मद अन्वर शेख (वय 23 वर्ष, रा. ठि. ई – सेक्टर, एम लाईन, रूम नंबर 12, चीता कॅम्प, ट्रॉम्बे मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता 2 हजार रुपये व ॲक्टिवा मोटारसायकल (क्रमांक MH – 04- HH-068) जप्त करण्यात आली. ही मोटार सायकल चोरीला गेल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपीचा पोलीस रेकॉर्ड

या आरोपीविरुद्ध वाशी रेल्वे पोलीस ठाणे (गु.र.क्र. 101/2021, कलम 379 भा. दं.वी.), ( गु.र.क्र. 105/2022, कलम 392 भा. दं.वि), ( गु.र.क्र. 106/2021, कलम 379 भा. दं.वि) गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

यांनी केली कौतुकास्पद कारवाई

ही कौतुकास्पद कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मोरकाने, पो.उप.नि. शरद नाणेकर, स.पो.उ.नि. धुमाळ, हवालदार आव्हाड, लेभे, अंमलदार देशमुख यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!