police varata

Mumbai’s Bangurnagar police succeed in recovering 25 tola worth of jewellery


२५ तोळ्याचे दागिणे शोधण्यात मुंबईच्या बांगुरनगर पोलिसांना यश

१०० सीसीटीव्हींचे तपासले फुटेज

मुंबई : मुंबईच्या बांगरुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला ऑटोरिक्षाने प्रवास करत असताना, तिचे २५ तोळे सोन्या-चांदीचे दागिने असलेली पिशवी रिक्षामध्ये विसरली. या प्रकरणाची तक्रार मिळताच, बांगरुनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली.

रात्र असल्याने आणि रिक्षाचा नंबर अस्पष्ट असल्यामुळे तपास कठीण झाला होता. मात्र, पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, रिक्षाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. सात दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाचा शोध लावला आणि त्या रिक्षामधून महिलेचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या हस्ते तक्रारदार महिलेकडे सोने-चांदीचे दागिने सुपूर्द करण्यात आले. या यशस्वी तपासात अपर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने महत्वाची भूमिका बजावली.

यांनी केली उल्लेखनिय कारवाई

उल्लेखनिय कामगिरीसाठी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि संजय सरोळकर, पोलीस हवालदार भोसले, शेलार, राठोड, पाटील, दळवी आणि तांत्रिक विभागातील पोलीस शिपाई आदित्य राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!