पोलीस अधिकारी, अंमलदारांना मिळाली कर्तव्याची गुरुकिल्ली
मु्ंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे मोलाचे मार्गदर्शन
मुंबई : इच्छाशक्तीच्या जोरावर कठोर परिश्रम करून लोहमार्ग पोलीस (Railway Police) खात्यात २१ पोलीस उपनिरीक्षक व ५८० महिला व पुरुष अंमलदार भरती झाले. पोलीस खात्यातील कर्तव्याचा व दरडोही जीवनात व्यक्ती म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अफाट अनुभव असलेल्या मंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नव्याने पोलीस खात्यात दाखल झालेल्यांना लाखमोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी ज्ञानेश्वरीतील (Dnyaneshwari) अनेक उदाहरणे देऊन या पोलिसांना कर्तव्याची गुरुकिल्ली दिली.

Challenges facing the police। पोलिसांसमोरील आव्हाने
अधिकारी व अंमलदार यांना रेल्वे पोलीस दल, त्याची संरचना, कार्यक्षेत्र, कार्यपद्धत आणि रेल्वे पोलिसांसमोरील आवाहने, पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज कसे केले जाते याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी घाटकोपर येथील संवाद सत्र नवरंग सभागृहात ( Navrang Hall at Ghatkopar)विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयपीएस डॉ. रवींद्र शिसवे बोलत होते.
Best wishes to the police for their future duties

सर्व प्रथम पोलीस दलात नियुक्त होऊन पोलीस प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल डॉ. रवींद्र शिसवे यांनी नवप्रविष्ठ अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. त्यांच्याशी संवाद साधत रेल्वे पोलीस दल, त्याची संरचना, कार्यक्षेत्र, कार्यपद्धत आणि रेल्वे पोलीसांसमोरी आवाहने, पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकाता याची माहिती दिली. पोलीस दलात कर्तव्य बजावताना वैयक्तीक आयुष्य व व्यावसायिक आयुष्याची सांगड कशी घालावी, भ्रष्टाचारमुक्त पोलीस कर्तव्य, सामाजिक बांधीलकी, पोलीसांचे दायीत्व, समाजाप्रति सुटल दृष्टीकोन, तत्परता, सचोटी या विविध विषयांवर ज्ञानेश्वरीचे संदर्भ देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. आयुष्यात सकारात्मक बदल घडविता येऊ शकतात हे सांगून डॉ. शिसवे यांनी सर्व पोलिसांना पुढील कर्तव्यासाठी लाखमोलाच्या शुभेच्छा दिल्या.