police varata

Mumbai Police Crime Branch । Mumbai Anti Narcotics Crime Branch । Police Marijuana plants

मुंबईच्या वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाची कौतुकास्पद कारवाई

धुळ्यात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीचा पर्दाफाश
५ कोटी ६३ लाखांचा गांजा जप्त

Police varta news Network
मुंबई : धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीचा मुंबईच्या वांद्रे अमलीपदार्थविरोधी पथकाने पर्दाफाश केला. या कारवाई ५ कोटी ६३ लाख रुपयांचा गांजा व गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

पहिली कारवाई मुंबईत…

गुन्हे शाखा वांद्रे युनिटच्या पथकाने १५ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील साकिनाका परिसरात ‘गांजा’ विकणाऱ्या आकाश दिलीप चव्हाण (वय 26) याला अटक केली होती. या आरोपीकडून ४७ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी कक्षाने (गु.र.क्र. ४४/२०२४) एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (क) नुसार गुन्हा दाखल केला होता.

 मुंबई-धुळे कनेक्शन । Mumbai-Dhule connection

 या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीने धुळे जिल्ह्यातील राहणारा असून त्याने तेथील एकाकडून गांजा घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक धुळ्यातील शिरपूर येथे दाखल झाले. तेथे आरोपीने सव्वा दोन एकर शेतीत गांजाची लागवड केल्याचे आढळले. या कारवाईत २ हजार ७७४ किलो वजनाची गांजाची झाडे व ४२.५. किलो वजनाचा ओलसर / सुका गांजा असा ५ कोटी ६३ लाख रुपयांचा २ हजार ८१६.५ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलीस आल्याची भणक लागताच शेती करणाऱ्याने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कौतुकास्पद कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती,  सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), शशी कुमार मीना,अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शाम घुगे, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त दत्ता नलावडे, एसीपी सुधीर हिर्डेकर, सहायक पोलिस आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा,  वांद्रे युनिटचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, नितीन केराम, सुरेश भोये, रवींद्र मांढरे, सपोनि श्रीकांत केरकर, अमोल कदम, अंमलदार कुलकर्णी, फाळके व पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!