police varata

Mumbai Crime Solved by National Police Group

★खुर्च्या तोडल्या म्हणून पोटात खुपसला चाकू
★नॅशनल पोलीस ग्रुपमुळे मु़ंबईच्या गुन्ह्याची उकल
★धावत्या एक्सप्रेसमध्ये (जबलपूरमध्ये) आरोपीला ठोकल्या बेड्या

मुंबई : कर्तव्याला हद्द नसते, हे पुन्हा एकदा नॅशनल पोलीस ग्रुपमुळे (National Police Group) उघडकीस आले. या ग्रुपमधील कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे मुंबईच्या आरोपील जबलपूर येथे धावत्या एक्सप्रेसमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. या आरोपीने खुर्च्या तोडल्या म्हणून रुम पार्टनरच्या पोटात चाकू खुपसून पळ काढला होता.

गुन्ह्याचा घटनाक्रम

नरेंद्र देव सिंह (वय 32 वर्षे, धंदा – शेफ, पत्ता – पटेल वाडी, A B नायर रोड, जुहू, मुंबई) हा व अजमद मोहम्मद अहमद (वय 28 वर्षे) हे दोघे एकाच रूममध्ये राहत असून जुहू येथील किंग्स इंटरनॅशनलमध्ये शेफ आहेत. 7 मार्च रोजी अजमद मोहम्मद अहमद याने राहत्या घरातील दोन खुर्च्या तोडल्या. यामुळे संतापलेल्या राकेश कुमार याने याबाबत जाब विचारला. यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला. इतर मित्रांनी मध्यस्ती करून त्यांच्यातील भांडण सोडवले.
दरम्यान, 8 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात अजमदने राकेशकुमारच्या पोटात चाकू खुपसला आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 260/ 24 कलम 307 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.

अशी झाली गुन्ह्याची उकल

या गुन्ह्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना आरोपी महानगरी एक्स्प्रेसने (Mahanagari Express) मूळगावी मिर्झापूर येथे जात असल्याची माहिती पोलिसांना समजली. ही माहिती नॅशनल पोलीस ग्रुपवर पोस्ट करताच सर्व पोलीस सतर्क झाले. जबलपूर आरपीएफचे पोलीस निरीक्षक मनसुरी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय मनोहर धावत्या एक्सप्रेसमध्ये अजमद मोहम्मद अहमद याला ताब्यात घेतले. या आरोपीला अपर पोलीस आयुक्त परमजीत सिंग दहिया, परिमंडळ ९ चे उपायुक्त रजतिलक रोशन, एसीपी महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस निरीक्षक झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण व पोलीस पथक मुंबईत आणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!