Site icon police varta

Mumbai Crime Branch Unit 11 handcuffed the gangster for whom the UP Police had announced a reward of Rs 50,000

यूपी पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केलेल्या गँगस्टरला मुंबई गुन्हे शाखा युनिट ११ ने ठोकल्या बेड्या

मुंबई : यूपी पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या गँगस्टरला मुंबई गुन्हे शाखा ११ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. या आरोपीला पुढील तपासासाठी यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


यूपीतील कोतवाली गाझियाबाद पोलीस ठाण्यासह ७ गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत टोळीतील आरोपी सब्बीर आलम हसिम उद्दीन शेख (35 वर्ष, रेसी – देहलबारी, बागलबारी, किशनगंज, सिंघिया, बिहार) याला फरार घोषित करण्यात आले होते. तेथील पोलीस त्याचा शोध घेत असताना तो मुंबईत लपल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहिती मुंबई पोलिसांना समजताच युनिट ११ च्या पथकातील पोनि भरत घोणे, प्रवीण सावंत व युनिट-11 चे पथक लोअर परेल मुंबईकडे रवाना झाले, पोलीस आल्याची भणक लागताच आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी अँटॉप हिल आणि धारावी येथे 10 तास त्याचा शोध घेतला आणि तांत्रिक माहितीच्या आधारे माहिम परिसरातून आरोपी सब्बीर आलम हसिम उद्दीन शेख याला ताब्यात घेतले.

Exit mobile version