police varata

Mobile stolen while booking Ola car in Mumbai । मुंबईत ओला कार बूक करताना पळवला मोबाईल

आरोपी टेम्पोचालकाला शिवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : ओला कार बूक करत असताना एका व्यक्तीच्या हातातून मोबाईल खेचून (Mobile stolen while booking Ola car in Mumbai)पळवणाऱ्या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या शिवडी पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान चोरलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

अशी झाली चोरी…

संजू गोपाळ मेनंन (वय 42.) हे रो रो गेटसमोरून ओला कार बूक करत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने संजू यांच्या हातातून मोबाईल पळवला. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी (गु.र.क्र. व कलम* 230/2023 कलम 392 भा.दं.वि) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस करू लागले.

अन् आरोपीला ठोकल्या बेड्या

या गुन्ह्याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे केला असता पोलिसांना आरोपीची माहिती समजली. आरोपी डोंगरी भागात असून टेम्पोचालक असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले असता आरोपी चेंबूरमधील वाशीनाका येथे सापळा लावून आरोपी मुस्तफा रईस खान (वय 28) याच्या मुसक्या आवळल्या.

यांनी केली गुन्ह्याची उकल

वपोनि विशाल चंदनशिवे, पो.नि.माने (गुन्हे) माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर काळेकर, पो. उप. नि. कमलेश पाटील, हवालदार गायकवाड, कदम, अंमलदार साळेकर, जमादार, पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!