Site icon police varta

Misuse of RTI in Thane | ठाण्यात माहिती अधिकाराचा गैरवापर

Misuse of RTI in Thane


आझाद मैदानात उपोषणास बसून शासकीय अधिकाºयांकडे खंडणी मागणारे गजाआड

गुन्ह्याचा घटनाक्रम

जयंत दामोदर जोपळे, व्यवसाय- नोकरी (सह दुद्घयम निबंधक, वर्ग 2) यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता सुभाष पाटील (रा. नाशिक), समशाद पठाण, संतोष हिरे यांनी केला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारअर्ज केला. निलंबन टाळायचे असल्यास २ लाख रुपयांची मागणी केली. मात्र जोपळे यांनी खंडणी देण्यास नकार देताच या तिघांनी दुय्यम निबंधक, वर्ग २ कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. तसेच मुंबईतील आझाद मैदानात वेळोवेळी उपोषणास बसून २ लाख रुपयांची मागणी केली. वारंवार होत असलेल्या पैशांच्या व भ्रष्टाचाराच्या आरोपाला वैतागून जयंत यांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला.

आरोपींसाठी कळवा येथे लावला सापळा

आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी ट्रॅप लावला. त्यानुसार आरोपी कळव्यातील सरोवर हॉटेल येथे खंडणी रक्कम घेण्यासाठी आले. आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी आधीपासून वपोनि शेखर बागडे, (Senior Police Inspector Shekhar Bagde,) सपोनि श्रीकृष्ण गोरे व पोलीस पथकाने सापळा लावला होता. जयंत जोपळे यांच्याकडून पैसे घेताना संतोष हिरे, समशाद पठाण यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 597/2023 भा.दं.वि. कलम 384, 385, 386, 387, 506(2), 34 नुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

नाशिकचा माहितीचा अधिकार कार्यकर्ताही अटकेत

या दोन्ही आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांना नाशिकमधील माहितीचा अधिकार कार्यकर्त्याबाबत समजले. त्यानुसार पोलिसांनी सुभाष नथु पाटील (वय 40) याला अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या आरोपींनी अनेकांना धरले वेठीस 

या आरोपींनीे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना वेठीस धरले होते. अनेकांविरुद्ध बातम्या प्रसिद्ध करून कारवाई टाळण्यासाठी उपोषण करून दबाव आणण्याचा प्रयत्न करून पैसे मागितले आहेत, अशी माहिती तपासादरम्यान समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version