police varata

Missing mobile phones recovered from Karnataka, Rajasthan, Uttar Pradesh, Gujarat

Missing mobile phones recovered from Karnataka, Rajasthan, Uttar Pradesh, Gujarat

गहाळ झालेले मोबाईल कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमधून केले जप्त
अंमलदार धायगुडे, खेडकर यांची उत्तम कारवाई

Police varta News Network

पुणे : गहाळ झालेले मोबाईल कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमधून जप्त करण्यात आले. ही उत्तम कारवाई अंमलदार धायगुडे, खेडकर यांनी केली. मोबाईल परत मिळाल्याने १५ नागरिकांनी पर्वती पोलिसांचे आभार मानले.

पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या ६ महिन्यांत अनेक नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकºयांनी दिले. त्यानुसार तपासासाठी पोलीस नाईक (बक्कल नं. ७२८२), धायगुडे, अंमलदार (बक्कल नं. १००११) खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू करण्यात आला. तपासाअंती मोबाईल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातमधून १५ मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल ५ नोव्हेंबर २०२४ रोजी परिमंडळ ३ चे उपायुक्त पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ३, पुणे शहर यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांनी पर्वती तसेच पुणे शहर पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त
संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना धायगुडे व अंमलदार खेडकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!