एमडी तस्करांना ठोकल्या बेड्या,
हवालदार अमोल देसाईंमुळे गुन्ह्याची उकल,
२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : एमडी (MD smugglers) बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही उल्लेखनिय कारवाई हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलीस दलाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने (thane Anti-narcotics squad) केली. या कारवाईत १५२.५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम. डी. Mephedrone) सह २५ लाख ८८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठाणे शहर ड्रग्जमुक्त ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Police Commissioner Ashutosh Dumbare) यांनी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अमलीपदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली. या अंतर्गत ड्रग्ज तस्कर, नशा करणाऱ्यांवर लक्ष ठेवत असताना हवालदर अमोल देसाई यांना एमडी बाळगणाऱ्यांची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाण्यातील मानपाडा परिसरातील हॅपी व्हॅली रोड, हॅपी व्हॅली सर्कल येथे सापळा लावला. त्यावेळी एम.डी. विकण्यासाठी मोटारसायकलवरून आलेल्या मोईन मोहम्मद आरिफ निर्बाण (वय २९ वर्षे, रा. ठि. नयागर, मिरारोड, ठाणे), मोहम्मद मुझमिल लियाकतअली नागोरी (वय २७ वर्षे, रा. ठि. नयागनर, मिरा रोड, ठाणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १५२.५९ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) आढळले.
या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात (गुन्हा नोंद कमांक ५१/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २२ (क), २९) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदशि गावित, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दीपेश किणी, हवालदार अमोल देसाई, प्रशांत राणे, संदीप भांगरे, हेमंत महाले, हुसेन तडवी, हरिष तावडे, अभिजीत मोरे, शिवाजी वासरवाड, शिल्पा कसबे,पोलीस नाईक अनुप राक्षे, अंमलदार कोमल लादे यांनी केली.