चेन स्नॅचिंगच्या १८ गुन्ह्यांतील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या;
सपोनि धनराज केदार यांची उल्लेखनिय कामगिरी
✒️प्रशांत माने
ठाणे : चेनस्नॅचिंग चोरीच्या १८ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक २ च्या पथकाने केली.
शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ( गु. २.नं. । १२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा, घटक-२ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार हे पोलीस पथकासह करीत होते. त्यावेळी त्यांना खबऱ्याने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन एफ झेड. मोटर सायकल चोरणाऱ्या आरोपीची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी भिवंडीतील बैलका मैदान, चव्हाण कॉलनीच्या मागे ताडी पिण्यासाठी आलेल्या ऑन अली सरर्फराज जाफरी उर्फ शेट्टी (वय २४ वर्षे, रा. पिराणीपाडा, भिवंडी) याला चोरीच्या स्कुटरसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ४ चेन स्नॅचिंग व ३ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.
२ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
तपासादरम्यान आरोपीकडून २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल. सदर आरोपी हा नारपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. । १०९७/२०२३ भा.द.वि.क. ३९२,३४ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) यासह १८ चन स्नेचिंगच्या गुन्ह्यांमध्ये फरार आहे. तसेच त्याच्यावर यापुर्वी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरी व चेन स्नॅचिंगचे १४ गुन्हे दाखल आहेत.
ही कौतुकास्पद कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त (शोध-१, गुन्हे शाखा) शेखर बागडे, गुन्हे शाखा, घटक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, किशोर थोरात, अंमलदार अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, नितीन बैसाने यांनी केली.