महिलांचे दागिने खेचून धावत्या रेल्वेतून उडी मारून पळणाऱ्याला ठोकल्या बेड्या;
४ गुन्ह्यांची उकल करण्यात कुर्ला रेल्वे पोलिसांना यश
भीमराव काळे
मुंबई : महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून धावत्या रेल्वेतून उडी मारून पळणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. हा आरोपी कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान खिडकीत हात घालून ऐवज खेचून पळ काढत होता. हा आरोपी कुर्ला लोहमार्ग पोलिसांच्या (Kurla Railway Police) हाती लागल्याने ४ गुन्ह्यांची उकल झाली असून ३ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुर्ला ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान महिलांचा ऐवज चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हाती लागलेल्या माहितीनुसार पोलिसांनी विद्याविहार स्थानक परिसरात सापळा लावून आरोपी अन्वर हुसेन शेख (५५) याला अटक करण्यात आली.
या गुन्ह्याची उकल
कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गु.र.नं. 185/2025 कलम 304 (2) BNS, 2) गु.र.नं. 153/2025 कलम 304 (2) BNS, 3) गु.र.नं. 120/2025 कलम 304 (2) BNS, गु.र.नं. 034/2025 कलम 304 (2) भारतीय न्याय संहिता) ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी रविंद्र शिसवे, पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, मध्य परिमंडळ, मनोज पाटील, एसीपी सुधाकर शिरसाट यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव, पोलीस निरीक्षक, चंद्रकांत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनिरी/सुभाष राठोड, हवालदार बागले, जाधव, कोयंडे, महिला अंमलदार देसाई, पाटील, खाडे, रहेरे, पठाण, पाटील, चव्हाण, दिघे यांनी केली.