Site icon police varta

Major action by the Economic Crime Branch in Satara

सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
खासगी सावकाराकडून १ कोटी १६ लाखांचे १४६ तोळे सोन्याचे दागिने केले जप्त

उदय आठल्ये
सातारा : शहरात आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई करून खासगी सावकारांच्या अमानुष सावकारी पद्धतीला चपराक बसली आहे. या कारवाईत १ कोटी १६ लाख ८० हजार रुपयांचे १४६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवाजी भोसले यांच्यासह पोलीस पथकचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कौतुक केले.

फिर्यादींनी आरोपींकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपयांची कर्जे घेतली होती. त्यावरील २.५% ते १०% दराने व्याज आकारले जाऊन फिर्यादींकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि मौल्यवान संपत्ती तारण म्हणून ठेवून घेतली होती. तसेच, ६५ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० लाखांचा प्लॉट तारण ठेवूनही फिर्यादींना आपली संपत्ती परत मिळाली नाही. सन २०१८ ते २०२३ दरम्यान फिर्यादींकडून मुद्दल व व्याजाच्या स्वरूपात ३ कोटी ४ लाख रुपये भरल्यानंतरही तारण परत न केल्याने फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
याशिवाय, दुसऱ्या प्रकरणात ८१ तोळे सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी १९ लाख ९८ हजार रुपयांवर अव्वाच्या सव्वा व्याज आकारून दागिने परत करण्यास टाळाटाळ केली होती.

उल्लेखनीय तपास

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने या गुन्ह्यांचा कसून तपास केला. तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांचे सखोल चौकशी करत आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात आले. अखेर १४६ तोळे वजनाचे दागिने हस्तगत केले.

अधिकाऱ्यांचे विशेष योगदान

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक आश्लेषा हुले, पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अंमलदार प्रमोद नलवडे, राजू मुलाणी, विकास इंगवले, सुरज गवळे, संजय मोरे, संतोष राऊत, अजित पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, अमित माने, गणेश कापरे, अमित सपकाळ, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम यांनी कारवाईत विशेष योगदान दिले.

समाजासाठी संदेश

या कारवाईमुळे खासगी सावकारीच्या अवैध प्रथा आणि आर्थिक शोषणाला चाप लावला आहे. पोलिसांच्या या धाडसी पावलामुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version