Site icon police varta

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पटकावले पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ चे विजेतेपद। Kolhapur District Police Force won the title of Police Duty Melawa 2024

उदय आठल्ये

कोल्हापूर : राज्य पोलीस दलाच्या १९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावात कोल्हापूर जिल्हा पोलीस दल विजयी ठरले. या मेळाव्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या सन्माासाठी कविता बी अगरवाल, प्रमुख व जिल्हा न्यायाधीश, सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, संदिप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा आद अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कवीता अगरवाल यांनी मार्गदर्शन करताना पोलीस दल हे आपल्या समाजाच्या सुरक्षेसाठी सतत कार्यक्षम असते, त्यांच्या सेवेमध्ये केवळ शारीरीक क्षमताच नव्हे, तर मानसिक आणि वैचारीक क्षमताही महत्त्वाची असतात अशा कार्यक्रमांमुळे पोलीस दलातील जवानांना त्यांची शारिरीक आणि मानसिक क्षमता आणि परस्परांमध्ये सामंजस्य वाढविण्यास मदत करतात. खेळ आणि स्पर्धा हे आपल्या जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत, हे केवळ सक्षम ठेवत नाहीतर आपल्याला शिस्त, एकता आणि सहकार या मुल्यांची शिकवण देतात. यामुळेच खेळ हे केवळ शरिराचा व्यायाम नाहीतर मन, आत्म्याचा विकास करणारे साधन आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कर्तव्य मेळाव्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण असे ५ जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. १६ ते१८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पोलीस श्वान स्पर्धा, पोलीस पोट्रेट टेस्ट, ऑब्झरवेशन टेस्ट, मेडीकोलीगल टेस्ट, फिंगरप्रिंट टेस्ट, कॉम्प्युटर अवेरनेस या विषयाच्या स्पर्धा संपन्न झाल्या. १७ ऑक्टोबर रोजी लिफ्टींग पॅकिंग लेबलींग स्पर्धा, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हीडीओग्राफी, पोलीस श्वानांच्या बॉम्बशोधक स्पर्धा संपन्न झाल्या तर १८ ऑक्टोबरला क्रिमीनल इन्व्हेस्टीगेशन, क्रिमीनल लॉज, प्रोसिजर व फॉरेन्सीक सायन्स या विषयावरच्या लेखी परिक्षा संपन्न झाल्या. यावेळच्या पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये प्रथमच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांना विविध प्रसंगी समारंभपुर्वक आमंत्रीत करण्यात आले होते. तसेच यावेळी महिला स्पर्धक व पंच यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
उत्कृष्ठ व निटनिटक्या आयोजनानंतर पुढील वर्षीच्या स्पर्धा आयोजनाकरीता स्पर्धेचा ध्वज सातारा पोलीस दलाकडे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.

या पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या समारोप प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो, अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय प्रिया पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित क्षीरसागर, शाहुवाडी विभाग अप्पा पवार, शहर विभाग अजित टिके, संजय घोडावत चेअरमन संजय घोडावत विदयापीठ अतिग्रे, जयसिंगपूर, शंकर दुलानी, उद्योगपती कोल्हापूर, पोनि रविंद्र कळमकर, पोनि जिविशा प्रमोद शिंदे, सायबरचे पोनि नंदकुमार मोरे तसेच स्पर्धक व इतर अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

Exit mobile version