सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम
दिवाळीचा उत्सव सगळीकडे सूरू आहे. मात्र, समाजातील काही निवडक घटकांसाठी आला दिवस समान असतो. नियतीने वाट्याला दिलेल्या परिस्थितीशी झगडत अनेकांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही बाब लक्षात घेत कराड शहर वाहतूक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबविला. कराड येथील कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृहातील अनाथ, गरीब निराधार लहान बालकांसोबत दिवाळी सण साजरा केला.
मुलांना नवीन कपडे व इतर वस्तू भेट देण्यात आल्या. या मुलांची दिवाळी गोड करणाऱ्या कराड शहर वाहतूक पोलिसांना ‘पोलीस वार्ता’चा मानाचा सलाम!