Site icon police varta

IPS Tejashwi Satpute promoted

आयपीएस तेजस्वी सातपुते यांना पदोन्नती

✒️ उदय आठल्ये (पोलीस मित्र)

वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील निवडक आयपीएस अधिकाऱ्यांना गिफ्ट मिळाले. 9 अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा समावेश आहे.
या 9 आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.असा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला आहे.त्यामुळे आगामी काळात त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सलग तेरा वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती दिली जाते

तेजस्वी सातपुतेंची कारकीर्द

तेजस्वी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावच्या! त्यांचे बायोटेक्नॉलॉजी, लॉमध्ये शिक्षण पूर्ण झाले आहे. तेजस्वी नावाप्रमाणे त्यांनी आजवर कामगिरी केली आहे. 2012 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे येथे वाहतूक शाखेच्या प्रमुख (DCP) पदाची जबाबदारी उल्लेखनियरित्या हाताळली होती. धडकेबाज कर्तव्यामुळे त्यांची स्वत: एक वेगळी ओळख पोलीस खात्यात निर्माण केलेली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे, सातारा, सोलापूर ग्रामीण येथे कर्तव्य बजावले आहे. अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यातून समाजामध्ये पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

सोलापुरातील ‘ऑपरेशन परिवर्तन’

हातभट्टीच्या दारूचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन ही मोहीम हाती घेतली. पिढ्यानपिढ्या गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने समाजाने वाळीत टाकलेल्या ३२७ कुटुंबियांचे या मोहिमेंतर्गत पुनर्वसन करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांना नोकरी, किराणा दुकान, चहाची टपरी, रिक्षा अशा स्वरूपाच्या व्यवसायात सक्रियपणे पुनर्वसन केले आहे.

नावाप्रमाणे तेजस्वी विचारांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

Exit mobile version