police varata

ips officer ashutosh dumbre appointed new thane police commissioner । ठाणे पोलीस आयुक्त पदी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती

ठाणे : राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ठाणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी यापूर्वीही ठाणे पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त पदावर कर्तव्य बजावले असून वेगवेगळे उपक्रम राबवत आपल्या कामाचा वेगळा ठसा जनमानसात उमटविला होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी आयपीएस जययीत सिंग

ठाण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्त असलेल्या आयपीएस जयजीत सिंग यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या जागी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली. डुंबरे हे १९९४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त, सह पोलीस आयुक्त पदावर कर्तव्य बजावले आहे. मितभाषी आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख आहे.

ज्येष्ठांसाठी ‘कर्तव्य’

ठाण्यात सह पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी शहराच्या वाहतूक नियोजनात योग्यरित्या करण्यासाठी त्यांनी पावले उचलली होती. घरात एकटेच वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठांवरील अत्याचार आणि लुटीच्या उद्देशातून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले या स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली होती. केवळ हेल्पलाइन सुरू करून ते थांबले नाहीतर त्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने ज्येष्ठांसाठी ‘कर्तव्य’ हा उपक्रम हाती घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!