Site icon police varta

In Kandivali, the man who made MD at home was exposed। कांदिवलीत घरातच एमडी बनवणाऱ्याचा पर्दाफाश

दोन जणांना १ कोटी ५ लाखांच्या एमडीसह अटक

मंबई : एमडी बनवण्याचा राहत्या घरातच कारखाना उघडल्या प्रकरणी दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई मुंबईतील मालवणी पोलिसांनी केली. या कारवाईदरम्यान १ ग्रॅम ” मेफेड्रॉन” (MD) ५ हजार रुपये, १०० थिनर या नशेच्या बॉटल किंमत ७ हजार, ५०३ ग्रॅम उच्च प्रतिचा ” मेफेड्रॉन” (MD)” हा अंमली दार्थ जप्त किंमत रुपये १ कोटी ६० हजार, एमडी हा अंमली पदार्थ बनविण्याचे केमिकल, साहित्य व मशिन असा एकूण १ कोटी ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे ड्रग्जचे मोठे रॅकेट । A big drug racket उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

असा उघडकीस आला गुन्हा

ड्रग्जमुक्त मुंबई शहर करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस विभागांना व स्थानिक पोलीस ठाण्याना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मालवणी पोलीस तस्करांव लक्ष ठेवून असताना त्यांच्या हाती नशेसाठी १ ग्रॅम एमडी व थिनरची बाटली बाळगणारा लागला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव अबरार इब्राहिम शेख (वय ३०) सांगितले. तसेच एमडी देणाऱ्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कांदिवली पश्चिम परिसरातल्या संघवी इस्टेट येथील (चारकोप इस्लाम कंपाऊंड)समता वेलफर सोसायटीत सापळा लावला. पहिल्या मजल्यावरील रुम नं ७ मध्ये पोलिसांनी धाड टाकली असता नूर आलम मेहबुब आलम चौधरी (वय २४) हा एमडी बनवताना आढळून आला.

१५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

 या प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत योग्य त्या सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता करून दोन पंचासमक्ष झडती घेतली असता एकुण ५०३ ग्रॅम उच्च प्रतीचा" मेफेड्रॉन" (MD)" हा अमली पदार्थ आढळून आला. तसेच सदर खोलीच्या झडतीमधे एमडी हा अंगली पदार्थ बनविण्याकरीता लागणारे केमीकल, इतर साहित्य व मशिन्स हे साहित्य असे एकुण १  कोटी ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली. या आरोपीला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Malvani Police । यांनी केली कारवाई
ही कारवाई Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar । मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, Special Commissioner of Police Deven Bharti । विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, बृहन्मुंबई (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई) राजीव जैन, परिमंडळ ११ चे उपायुक्त अजय कुमार बन्सल, सहाय्यक पोलीस आयुक्त (मालवणी विभाग) शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढा, पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि, निलेश साळुंके, हवालदार अनिल पाटील, अंमलदार राठोड, विलास आवाड, शिंदे, सचिन वळतकर यांनी केली.

Exit mobile version