police varata

Hinjewadi police seized Gutkha worth 18 lakhs | सपोनि राम गोमारे यांच्यामुळे १८ लाखांचा गुटखा जप्त

hinjewadi police


हिंजवडी पोलिसांनी सापळा लावून केली कारवाई

पुणे : महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही गुटखा व तंखाबूजन्य पदार्थांची तस्करी करणाºया दोन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी १८ लाखांचा गुटखा जप्त केला. हा मुद्देमाल कोठून आणला, कोणाला विकणार होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

कारवाईसाठी बंगळुरू-मुंबई हायवेवर लावला सापळा

    गुन्हे शोध तपास पथकातील सपोनि राम गोमारे यांना ३ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन जण बंगळुरू-मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने पांढºया रंगाच्या पिकअपमधून बंदी असलेला तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला विकण्यासाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती खबºयाने सपोनि राम गोमारे यांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून मिळालेल्या वर्णनाची गाडी अडवली. त्यातील दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपापली नाव वाकाराम ठाकरारामजी जाट (वय १९ वर्ष, रा. बालाजी ट्रेडींग कंपनी, जयभवानी हॉटेल जवळ, खालुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे मुळ गाव मु.पो. शेंडवा, ता. गोरामणी, जि. बाडनेर राजस्थान), बोगाराम सुखराम बिष्णोई (वय १९, रा. सदर) अशी सांगितली. गाडीची झडती घेतली असता त्यात गुटख्याचे बॉक्स व सुंगधी तंबाखूचे पाऊच आढळले. सदर माल त्याने कोणाकडून आणला याबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्याने सदरचा माल हा पाहिजे आरोपी सुजीत खिंवसरा (रा. कोथरूड, पुणे) याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगीतले. पिकअप वाहन व प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गु.र. क्र. १२४३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. 

     
  हिंजवडी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मुखांचे कर्करोग, इतर विकार होतात. त्यामुळे शासनाने प्रतिबंधित केला आहे. तरीही काही जण कायद्याचे उल्लंघन करून गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतात. अशा लोकांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन हिंजवडी पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

यांनी केली कारवाई    
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सपोउपनि बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, पोलिस हवालदार योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, अंमलदार रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!