police varata

Ganja smuggling from Orissa to Mahamumbai, Surat busted । ओरिसामधून महामुंबई, सुरतमध्ये होत असलेल्या गांजा तस्करीचा पर्दाफाश

मुंबईच्या घाटकोपर अमलीपदार्थविरोधी पथकाच्या कारवाईत १८२० किलो गांजासह ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : ओरिसा येथून महामुंबई व सुरतमध्ये होत असलेल्या गांजा तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह ५ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या घाटकोपर अमलीपदार्थविरोधी पथकाने केली असून ३ लाख ६० हजार रुपयांचा १८२० किलो गांजा, २५ लाखांचा ट्रक असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशी झाली कारवाईला सुरुवात

मुंबईत वाढत्या ड्रग्ज तस्करीला आळा घालण्याकरिता वरिष्ठांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करत घाटकोपर अमलीपदार्थविरोधी पथक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी गस्त घालत असताना विक्रोळी पूर्व येथील बस स्टॉपजवळ असलेल्या दोन व्यक्तींवर संशय आला. पोलिसांनी त्या दोघांची चौकशी करत झडती घेतली असता ट्रकची झडती घेतली असता १ हजार ८२० किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी आकाश सुभाष यादव (वय २५ वर्षे रा. ठि. राज्य गुजरात), दिनेशकुमार सजीवन सरोज (वय २६ वर्षे रा. ठि. ठाणे) यांच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्षात (गु.र.क्र. १७/२०२१ कलम ८ (क) सह २० (क), २९ एन.डी.पी.एस कायदा १९८५ सह कलम ३, १८१ मोटार वाहन कायदाप्रमाणे) गुन्हा नोंद करून त्या दोघांना अटक करण्यात आली. अटक आरोपींच्या चौकशीदरम्यान मुंबई, ठाणे, विरार, पालघर येथे गांजाची विक्री करणारा साथीदार संदिप भाऊ सातपुते याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २३ जून २०२१ रोजी त्याला अटक केली. या सर्व आरोपींवर १० ऑगस्ट रोजी दोषारोप पत्र सादर करण्यात आले असुन ते सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

सदर गुन्हयाचा मुख्य सुत्रधार लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई व त्याचा साथीदार बिद्याधर वृंदाबन प्रधान हे फेब्रुवारी – २०२१ पासुन ओरिसा, तेलंगना, हैद्राबाद, नेपाळ याठिकाणी त्यांचे अस्तित्व लपवुन राहात होते. ८ डिसेंबर २०२३ रोजी घाटकोपर युनिटला टोळीप्रमुखाची माहिती खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक भरमपुर (राज्य ओरिसा) येथे रवाना झाले. या दोघांना गोलंथारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. २०१६ सालापासुन गांजा विक्री टोळीचा प्रमुख लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई व त्याचा साथीदार बिद्याधर बूंदाबन प्रधान (रा.ठी. भरमपुर, जि. गंजम, ओरीसा) आणि त्याच्या टोळीतील इतर आठ सदस्य यांनी गांजा विक्रीची टोळी बनवुन ते ओरिसा येथुन गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करुन मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे हर, भिवंडी, पालघर, वसई विरार, मिरारोड, सुरत या ठिकाणी गांजा वितरीत करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र, गुजरातमध्ये दोन टन गांजाची विक्री

या टोळीने महिन्याभरात दोन टन गांजाची विक्री गुजरात, महाराष्ट्रात करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गांजा विक्रीतील पैशाचा व्यवहार हा रोखीने व हवालाचे माध्यमातुन केला जात होता. सदर टोळी ओरीसा राज्यातील गंजम जिल्ह्यात नियमीतपणे गांजा या अंमली पदार्थाचा पुरवठा सुरू होता. मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, एस्प्लेनड कोर्ट, मुंबई यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता अटक आरोपीनलक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई व त्याचा साथीदार बिद्याधर बूंदाबन प्रधान यांना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केली कारवाई..
ही कारवाई विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. प्रकाश जाधव, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, व काशिनाथ चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत घाटकोपर युनिटचे प्रभारी पो. नि. श्रीमती. लता सुतार यांचे नेतृत्वात स.पो.नि. लोंढे, स.पो.नि. महेश भांगे (वरळी युनिट), पो.उ.नि. चिकणे, पो.शि.क्र. ०८०६९९/महाले, पो.शि.क्र. ०८१७१६/साळुंखे, पो. शि. चा.क्र. ०९०१३०/ जांभळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!