police varata

Gangsters stealing gold chains in Kalyan, Dombivli | कल्याण, डोंबिवलीत सोनसाखळ्या चोरणारे गजाआड

manpada police

मानपाडा पोलिसांच्या कारवाईमुळे ९ गुन्ह्यांची उकल

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सोनसाखळी चोरणाºया दोन सराईत आरोपींना मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कौतुकास्पद कारवाई मानपाडा पोलिसांनी | Manpada Police केली. या कारवाईमुळे कल्याण, कोळसेवाडी, डोबिंवलतील चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे, मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून ८ लाख १८ हजार ५०० रुपयांचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५० हजारांची चोरलेली बाईक असा एकूण ८ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिक्षकाची पळवली चेन

२० आॅक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७.०५ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शिक्षक रवी सोन्या गवळी (४२, रा. मानपाडा रोड, डोबिंवली पूर्व) हे मॉर्निंग वॉक | Morning walk करत डी मार्टसमोरील मार्गावरून जाताना दुचाकीवरील दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून त्यांना धक्का दिला व चोरांनी पळ काढला. जमिनीवर पडल्याने ते जखमी झाली. या घटनेतून सावरत शिक्षकाने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. घडलेलाा प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गु. र. क्र. ८७० / २०२३ भा.दं.वि. ३९४, ३४ गुन्हा दाखल केला.

असा झाला गुन्ह्याचा उलगडा

सोनसाखळी चोरांचा शोध सुरू असताना २७ आॅक्टोबर २०२३ रोजी मानपाडा पोलिसांनी खबºयाने चोरांची माहिती दिली. त्यानुसार नवी मुबंई-तळोजा मार्गे (Via Navi Mumbai-Taloja) डोबिंवलीकडे येणाºया मार्गावर सापळा लावण्यात आला. आरोपी निसर्ग हॉटेल समोर येताच अवजड वाहने थांबवली. त्यामुळे आरोपी सतर्क झाले आणि दुचाकी रस्त्यावर सोडून पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलााग करून वारिस मिराज खान (वय २४, रा. अटाळी आंबिवली कल्याण), मोहम्मद जाफर कुरेशी (वय ३० रा. शहाड, कल्याण पूर्व) यांच्या मुसक्या आवळल्या.

कारवाई करणा-या पोलिसांना सलाम…
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे (Additional Commissioner of Police Dattatraya Shinde,), पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अशोक होनमाने, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि सुरेश मदने, पोनि (प्रशा) राम चोपडे, पोनि (गुन्हे) दत्तात्रय गुंड, सपोनि अविनाश वनवे सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोलीस हवालदार संजू मासाळ, पोलीस हवालदार शिरीष पाटील, पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस हवालदार विकास माळी, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, पोलीस हवालदार दीपक गडगे, पोलीस नाईक शांताराम कसबे, पोलीस नाईक यल्लप्पा पाटील, पोलीस नाईक महादेव पवार, पोलीस अंमलदार विजय आव्हाड, पोलीस अंमलदार महेंद्र मंझा, पोलीस अंमलदार विनोद ढाकणे, पोलीस अंमलदार अशोक अहेर, पोलीस नाईक महाजन, पोलीस अंमलदार चंद्रकांत खरात, पोलीस नाईक पाटील, पोलीस अंमलदार संदीप खरात यांच्या पथकाने केली असून या सर्वांना ‘पोलीसवार्ता’चा सलाम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!