मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी १२ तासांत केली गुन्ह्याची उकल
मुंबई : चाकूने वार करून रिक्षाचालकाला लुटणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी केली. गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
एक रिक्षाचालक २४ सप्टेंबर रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास अंधेरी परिसरातील चाय कॉफी बस स्टॉप येथे फोनवर बोलत होता. त्यावेळी चार जण तेथे आले. त्यांनी अनोळखी इसमांनी संगनमत करून चाकूचा दाखवून त्याच्या खिशातील फोन व रोख रक्कम १५ हजार रूपये हिसकावून घेतले. त्यावेळी चालकाने प्रतिकार केला असता त्या लुटारूंपैकी एकाने त्याच्य् हातावर चाकूने वार करून दोन मोटारसायकलवर बसुन आरोपी पळुन गेले. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गु.र.क्र. ५४५/२०२४, कलम ३०९ (६), ३(५) भारतीय न्याय संहिता सह १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे सुरू असताना आरोपी मेघवाडी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा लावून सुनित अनिलकुमार तिवारी (वय २० वर्षे, धंदा नाही, रा.ति. रूम नं. केईम/१४३, जिवा भाई सुखर पटेल चाळ, हनुमान मंदिराजवळ, हरीनगर, जोगेश्वरी पुर्व, मुंबई), विकास इश्वर खारवा (वय २४ वर्षे, धंदा डी जे वाजविणे, रा.ठि. रूम नंबर ०१, बिल्डींग नं. ६, नवकिरण सोसायटी, हरी नगर जोगेश्वरी पूर्व, मुंबई), राहुल अशोक राणा (वय २३ वर्षे, रा.ठि. ए/७०६, साईरूप को ऑप हौ. सोसायटी, बिल्डींग क्र. ०९, महाकाली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई), अरमान फिरोज शेख (२४) हे मिळून आल्याने पुढील चौकशीकामी पोलीस ठाणेस आणुन त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी रिक्षाचालकाला लुटल्याची कबुली दिली. या आरोपींना न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याची उकल परिमंडळ ९ चे उपायुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्यूंजय हिरेमठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जाधव, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नागेश मिसाळ, जाधव, पोउनि उगले, पोउनि पाटील, हवालदार महाडेश्वर, अंमलदार गोसावी, रकटे, थोरात, भोईर, पवार, ईनामदार, साबळे, पठाण, माडगे यांनी केली.