कळवा रुग्णालयात महिला प्रशिक्षणार्थीचा विनयभंग
डॉक्टरला तीन वर्षे सक्तमजुरी
ठाणे : जिल्ह्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील (Female trainee molested at Kalwa Hospital) शैल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख, डॉक्टर शैलेश्वर नटराजन यांना २०१४ मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. महिला प्रशिक्षणार्थीशी लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून नटराजन यांना तीन वर्षे सक्तमजुरी, ५०९ कलमासाठी एक वर्षाची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपशील
२०१४ मध्ये कळवा पोलीस ठाण्यात (Kalwa Police Station) गुन्हा क्रमांक ३५०/२०१४ नुसार, भारतीय दंड संहिता कलम ३५४ (A) आणि ५०९ अंतर्गत डॉक्टर नटराजन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान तत्कालीन पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर आणि त्यांच्या पथकाने भक्कम पुरावे सादर करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाचा निर्णय
मोहिनी ननावरे, न्यायाधीश, ४ थे न्यायालय, ठाणे यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. पोलिसांनी सादर केलेले दोषारोप सिद्ध झाल्याने नटराजन यांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५०९ कलमानुसार एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
सरकारी पातळीवर कौतुक
सरकारी वकिल लीना पेडणेकर यांनी खटल्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, हवालदार डी. एच. जाधव, अंमलदार बिन्नर यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले व त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरला दोषी ठरविण्यात यश आले. सदर उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलिसांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
👉 कोर्टाने शिक्षा सुनावलेली आणखी एक बातमी वाचा
👇
कळवा रुग्णालयात महिला प्रशिक्षणार्थीचा विनयभंग
डॉक्टरला तीन वर्षे सक्तमजुरी