police varata

Drugs worth Rs 4 crore seized in anti-drug drive in Mumbai; 11 smugglers arrested

मुंबईत ड्रग्ज विरोधी मोहिमेत ४ कोटींचा अंमली पदार्थ जप्त; ११ तस्करांना अटक

मुंबईत मोठी कारवाई: अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक मोहिम

मुंबई : मुंबईत अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिमेदरम्यान १२ डिसेंबर २०२४ ते १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालवणी, मालाड, मरोळ, अंधेरी, काळाचौकी, सायन, आणि गोरेगाव परिसरात एकाच वेळी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४.०१ कोटींच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या मोहिमेत ११ ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.

अशा केल्या कारवाया

☆ अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कार्यरत असलेल्या युनिट यांनी गस्त दरम्याण केलेल्या वेगवेगळया कारवाईत वरळी युनिटने काळाचौकी, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे ‘एम.डी. (मेफेड्रॉन)’ विक्री करणाऱ्या एका इसमासचे ताब्यातून १०७ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

☆ वरळी युनिटने केलेल्या आणखी एका कारवाईत सायन-धारावी लिंक रोड, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमाचे ताब्यातुल ४० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

☆ आझादमैदान युनिटने डॉकयार्ड-माझगाव, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमाचे ताब्यातून ४१ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

☆ वांद्रे युनिटने अंधेरी डोंगर, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमाचे ताब्यातुन ४३ ग्रॅम ‘एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

☆ कांदिवली युनिटने संतोष नगर, गोरेगांव पूर्व, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमाचे ताब्यातुन २१ ग्रॅम ‘एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

☆ घाटकोपर युनिटने डी. एन. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमाचे ताब्यातून ४४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच घाटकोपर युनिटने केलेल्या दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर, गोवंडी भागात गस्तीदरम्यान अवैधपणे गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाचे ताब्यातुन ६६० ग्रॅम ‘गांजा’ अंमली पदार्थ जप्त केला आहे.

मुंबई पोलिसांचे कृतज्ञ कार्य

मुंबईतील वाढत्या ड्रग्ज तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. या मोहिमेने अंमली पदार्थ विरोधी लढाईत एक नवा मापदंड निर्माण केला असून यामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!