police varata

Drug trafficking of cough syrup

नशेसाठी कफ सिरअपच्या औषधांची तस्करी
भिवंडीच्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखा ६ ने ठोकल्या बेड्या

मुंबई : भिवंडीच्या २ तस्करांना मुंबईतील मानखुर्दमध्ये अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण ६ च्या पथकाने केली. या कारवाईत नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ४१ कफ सिरअपच्या बॉटल्ससह १ लाख ३९ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई शहर अमलीपदार्थमुक्त ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 4 नोव्हेंबर 2024 रोजी 19.45 वाजण्याच्या सुमारास कक्ष 6 चे पोलीस निरीक्षक भरत घोणे, सपोनि गावडे, चिकणे, पोउनि सावंत, सपोउनि देसाई, हवालदार चव्हाण, घेरडे, भालेराव, जायभाय, महिला अमलदार अभंग हे पथक गस्त घालत होते. त्यावेळी मानखुर्द रेल्वे स्थानकासमोर 2 जणांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. पोलीस आल्याचे पाहून त्या दोघांनी पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ANREX HCL Syrup च्या 41 Bottles आढळल्या. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपापली नावे शाहरुख अनवर जमादार (वय 22 वर्षे, धंदा- चालक राठी रूम नंबर 4, फुरकान अर्जुनअली गाव, नाशिक रोड टोलनाक्याजवळ, ता. भिवंडी, ठाणे), साहिल अखिल शेख (23 वर्ष, धंदा. नाही, पत्ता. फुरकान अर्जुनअली गाव, नाशिक रोड टोलनाक्याजवळ, ता. भिवंडी, ठाणे) अशी सांगितली. या कारवाईत ४१ बॉटल्स, मोबाईल, दुचाकी असा एकूण १ लाख ३९ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या दोन्ही आरोपींना मानखुर्द पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून (वि.स्था.ख.क्र. 464 /2024 कलम 8 क, 22 क, 29) एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी हाती लागल्याने नशेसाठी कफ सिरफचा वापर करणारे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!