Site icon police varta

Dabang Additional Superintendent of Police Sagar Kawade of Wardha। वर्ध्याचे दबंग अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे

लेखक – उदय आठल्ये

(पोलीस मित्र +919975163547)

सातारा जिल्ह्यातील कराडचे सुपुत्र…

श्री.सागर कवडे हे सन 2011 साली स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊन पोलीस दलात दाखल झाले.त्यांनी 2013 ते 2014 महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेतले. 2014 ते 2015 साली जळगाव येथील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले. ऑगस्ट 2015 ते ऑगस्ट 2018 पर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली म्हणून कर्तव्य बजावले. गडचिरोली येथे दबंग कामगिरी विशेष सेवा व पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदावर कार्यरत असताना अनेक नक्षलविरोधी अभियानाचे नेतृत्व सागर कवडे यांनी केले त्यामध्ये आंतरराज्य नक्षलविरोधी अभियानाचा सुद्धा समावेश होता याच दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमकी नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरंग निकामी करणे नक्षलवादीचे आत्मसमर्पण घडवून आणणे अशा अनेक घटनांमध्ये पथकाचे नेतृत्व केले मृत नक्षलवाद्यांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात यावीत यासाठी या मुलांना शिक्षण व रोजगार विमा प्रशिक्षण देणारा प्रोजेक्ट अग्निपंख नावाचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात सागर कवडे यांनी राबवला गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाचन संस्कृती रूजावी वाढावी व नागरिकांना नक्षलवादाच्या दुष्परिणांमाची जाणीव व्हावी यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 27 दुर्गम पोलीस मदत केंद्रांमध्ये वाचनालयांची स्थापना करणारा प्रोजेक्ट ज्ञानगंगा हा उपक्रम राबवला आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या मनावरील डावे विचार पुसून त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा गांधी विचारधन परीक्षा हा उपक्रम राबविला गडचिरोली जिल्ह्यातील बजवलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालक पदक विशेष सेवा पदक तर केंद्र सरकारने आंतरिक सुरक्षा पदक देऊन गौरव केला उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली येथील कार्यकाल पूर्ण झाल्यावर सागर कवडे यांची बदली पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पंढरपूर येथे देखील सागर कवडे यांचा कर्तव्यदक्षिपला दिसून आला पंढरपूरचा पदभार घेतात त्यांनी तीर्थक्षेत्र पॉलिसी संकल्पना राबवली तसेच पंढरपुरात येणाऱ्या वारकरी तसेच भाविकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.. कोरोनाच्या कठीण काळात देखील सागर कवडे यांनी पोलीसांची काळजी घेतली.. पंढरपूर येथून त्यांची बदली पिंपरी येथे सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर झाली.. पिंपरी येथे कार्यरत असताना आपल्या विभागामध्ये अनेक विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा गुन्ह्यामध्ये सहभाग दिसून येत असल्याने सदर विधी संघर्ष ग्रस्त बालगीत समाजाच्या मुख्य प्रवास यावेत व नवीन विधी संघर्षग्रस्त बालके तयार होऊ नयेत यासाठी समुपदेशन वैद्यकीय उपचार पुनर्वसन क्रीडा असे अनेक उपक्रम राबवले.. आज अखेर आपले कर्तव्य बजावताना वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याची क्षमता सागर कवडे यांच्यात दिसून येत आहे.सन 2022 साली त्यांची पदोन्नतीने वर्ध्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली….

अशा या खाकीतल्या दबंग अधिकाऱ्याला १६ डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा

Exit mobile version