दिवसा कचरा वेचायचा आणि रात्री फिरण्यासाठी दुचाकी चोरायचा
डी. बी. मार्ग पोलिसांच्या कारवाईत मुंबई, नालासोपारा व नवी मुंबईतील ५ गुन्ह्यांची उकल
मंबई : दिवसा कचरा वेचायचा आणि रात्री फिरण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी केली. या कारवाईमुळे मुंबई, नालासोपारा व नवी मुंबईतील ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. हा आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याने आणखी दुचाकी चोरल्याचा संशय असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.
मोहम्मद असद जरार खान याने २२ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान Yamaha Rx 100 ग्रँट रोड परिसरातील बलराम स्ट्रीट, सिधवा बिल्डिंग कंपाउंड येथे उभी केली होती. सदर दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी त्याने तक्रार केली. त्यानुसार डॉ. डी.बी.मार्ग पोलिसांनी (गु.र.क्र. 153/24 भादंवि कलम 379 अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वांद्रे पूर्व परिसरातील गांधीनगर येथे सापळा लावून प्रथमेश किसन शिंदे (22 वर्षे,धंदा-कचरा वेचने, रा. ठी. रूम नंबर-3, गल्ली नंबर 8, ज्वेलरी शॉपचे वर, चिकन शॉपचे बाजुचे गल्लीत,नेहरूनगर, विलेपार्ले, पश्चिम, मुंबई) याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरलेल्या मोटारसायकलींची माहिती दिली. हा आरोपी हाती लागल्याने मुंबईतल्या डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्याचे२, वाशी, नालासोपारा, कफ परेड परिसरातले प्रत्येकी एक असे एकूण ५ मोटार सायकल चोरीेचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग, एसीपी रवी सरदेसाई, सीनिअर पीआय विनय घोरपडे, क्राईम पीआय विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन झाडे अंमलदार मयूर पालवणकर, शेखर अभंग, दीपक डावरे, संतोष कदम यांनी केली.