मिरा-भाईंदर वसई-विरारच्या सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
१५.२० लाखांची फसवणूक झालेली रक्कम केली परत
भाईंदर : सायबर फसवणुकीला बळी ठरून गमावलेले १५.२० लाख रुपयांची रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात आली आहे. ही कौतुकास्पद कामगिरी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेने एका ऑनलाईन शेअर ट्रेडिंग अॅपवर गुंतवणूक केली होती. परंतु, त्यांना या गुंतवणुकीतून कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली आणि फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यात गोठवली. रक्कम परत करण्यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करून रक्कम त्यांन परत करण्यात आली.
How do you avoid online fraud? । ऑनलाई फसवणूक कशी टाळाल?
- शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.
- फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम किंवा टेलिग्रामवरील जास्त परतावा देणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
- कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची योग्य पडताळणी करा.
- ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित बँक व सायबर क्राइम हेल्पलाईन (१९३०) वर संपर्क साधा.
कारवाई करणारे पोलीस
ही कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, , सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सपोनि स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी प्रसाद शेनोळकर, स्नेहल पुणे, अंमलदार कुणाल साबळे, शुभम कांबळे, हवालदार माधुरी धिंडे यांनी केली आहे.
Where can you report online fraud? । ऑनलाईन फसवणूक झाल्यास कोठे तक्रार कराल?
सायबर फसवणूक टाळण्यासाठी मदत हवी असल्यास:
सायबर क्राइम हेल्पलाईन: १९३०
वेबसाईट: www.cybercrime.gov.in
आपली सुरक्षा आपल्या हाती आहे. सतर्क रहा, सुरक्षित रहा!