पिस्तूलसह दोन काडतूस बाळगणारा अटकेत
पोलीस उप अधिक्षक श्याम पानेगावकर यांची कौतुकास्पद कामगिरी
✒️ उदय आठल्ये (पोलीस मित्र)
सातारा : पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कौतुकास्पद कारवाई पोलीस उप अधिक्षक श्याम पानेगावकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली. कुणाल सकटे असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्या.
नववर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी विशेष मोहीम राबविली आहे. या अंतर्गत पोलिसांची पथके गैरधंद्यांवर व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर लक्ष ठेवून असताना वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उप अधिक्षक श्याम पानेगांवकर यांना खबऱ्याने एका सराईत आरोपीची माहिती दिली. त्यानुसार वाई परिसरातील रविवारपेठच्या मांगखळी येथे पोलिसांनी सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कुणाल सकटे (रा. रविवारपेठ वाई ता. वाई जि सातारा) तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला देशी बनावटीचे पिस्टल व पॅन्टच्या खिशात २ जिवंत काडतूस आढळल्या. या शस्त्राची किंमत ६५ हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्याम पानेगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, ए. बी. सुर्वे, अंमलदार प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांनी केली आहे.
आतापर्यंत केलेल्या कारवाया
सातारा जिल्हा पोलीस दलाकडन नाव्हेंबर २०२२ पासून ते आतापर्यंत १०७ देशी बनावटीची पिस्टल ०४ बारा बोअर बंदुका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या व ०४ मॅग्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत,