घरफोडी, मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
पोलीस अंमदार अमोल इंगळे, उमेश ठाकूर यांची कौतुकास्पद कारवाई
ठाणे : घरफोडी, मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या ३ सराईत आरोपींना बेड्या ठाेकण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अंमदार अमोल इंगळे, उमेश ठाकूर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक २ च्या पथकाने केली. हे आरोपी हाती लागल्याने ७ गुन्हे उघडकीस आले असून ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भिवंडीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, मोबाईल चोरीच्या गुन्हयांचे तपासाबाबत विशेष पथक तयार करून अशा प्रकारचे घडलेल्या गुन्हयांचा आढावा घेवुन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा घटक २ चे पथक तपास करू लागले. तपासादरम्यान पोलीस अंमलदर अमोल इंगळे यांना घरफोडी, मोबाईल फोनची चोर करणाऱ्या आरोपींची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे कैफ इसरार सिद्धीकी (वय १९ वर्षे, रा. ठि. पटेल कंम्पाउड, धामणकरनाका, भिवंडी), अंकीत तेजाराम गुप्ता (वय १९ वर्षे, रा. ठि. शितलादेवी मंदिराच्या जवळ, शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सदर गुन्ह्यात चोरी केलेले लुम पार्टस इसम नामे निरज केशरवाणी, पत्ता पदमानगर पोलीस चौकीच्या मागे, भिवंडी यास विक्री केलेले आहेत.
दरम्यान, या गुन्ह्याच्य समांतर तपासामध्ये गुन्हे शाखा घटक २ चे अंमलदार उमेश ठाकूर यांना माहिती मिळाली की, आरोपी नामे मोहम्मद सैफ जावेद खान, रा. रावजीनगर, कल्याण रोड, भिवंडी याने भिवंडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल फोन चोरी, लॅपटॉप चोरी केल्या आहेत. प्राप्त माहितीच्या आधारे केले छापा कारवाईमध्ये मोहम्मद सैफ जावेद खान (वय २९ वर्षे, रा. फैजान मंझील रूम नंबर २०७, रावजीनगर, कल्याण रोड, भिवंडी, जि. ठाणे) यांला लॅपटॉप व मोबाईल फोनसह ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपीकडून दाखल गुन्ह्याव्यतिरीक्त मोबाईल फोन मिळून आले असुन सदरचे मोबाईल फोन नक्की कोठे चोरी झाले आहेत, याबाबत अधिक तपास करीत आहोत. २० हजारांचा आयटेल कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल फोन, असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या पथकाचा तपासात समावेश
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १ गुन्हे) निलेश सोनावणे, गुन्हे शाखा घटक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीराज माळी, सपोनि धनराज केदार, हवालदार अमोल देसाई, प्रकाश पाटील, देवानंद पाटील, किशोर थोरात, अंमलदार सचिन जाधव, अमोल इंगळे, उमेश ठाकूर, भावेश घरत, सचिन सोनावणे, नितीन बैसाणे यांनी केली आहे.