police varata

Bihar gang exposed for cheating under the guise of helicopter ride service during Mahakumbh Mela

महाकुंभ मेळाव्यामध्ये हेलिकॉप्टर राईडची सर्व्हिसच्या आड फसवणूक करणाऱ्या बिहारच्या टोळीचा पर्दाफाश;


मुंबईच्या कफ परेड पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

भीमराव काळे
मुंबई : महाकुंभ मेळाव्याच्या तीर्थस्थानी हेलिकॉप्टर राईडच्या आड फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई मुंबईच्या कफ परेड पोलिसांनी केली. या कारवाईत ५ जणांना अटक झाली असून, यात बेकायदेशीर सिम कार्ड देणाऱ्या तरुणीचाही समावेश आहे.


ऑनलाईन फॉर्ड करणारे दिवसेंदिवस नवनवीन फंडे वापरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबईच्या श्रीमती कोठेकर व त्यांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सुरू असलेल्या महाकुंभमेळाव्याच्या ठिकाणी (HELICOPTER RIDE) हेलिकॉप्टर राईड करायची होती. त्यामुळे त्यांनी १७ जानेवारी २०२५ रोजी GOOGLE सर्च इंजिनवर MAHAKUMBHA HELICOPTER RIDE असे सर्च केले. त्यावेळी त्यांना एक वेबसाईट निदर्शनास पडली. त्यांनी त्यावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता २६ जणांना ६० हजार ६५२ रुपयांत हेलिकॉप्टर राईड देण्यात येईल, असे सांगून पेमेंट करण्यासाठी क्यूआर (QR) कोड पाठविला. त्यानुसार कोठेकर यांनी ६०,६५२ रुपये ट्रान्सफर केले. ही रक्कम पवन हंस या सरकारी कंपनीला न जाता सोनामुनी देवी या महिलेच्या बँक खात्यात जमा झाली. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी पुन्हा वेबसाईट सर्च केली मात्र ती दिसून आली नाही. त्यामूळे त् यांनी मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी बूक केलेल्या तिकीटाबाबत त्यास विचारणा केली असता तो त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कफ परेड पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी (गु.र.क्र १३/२०२५ कलम ३१८(४), ३१९ (२), ३(५) भा न्या. सं सह कलम ६६, ६६ (क), ६६ (ड) मातं. कायदा अन्वये) गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

मुंबई पोलिसांची बिहारमध्ये कारवाई

तांत्रिक तपासादरम्यान फसवणूक केेलेली रक्कम बिहार शरीफ या शहरातल्या विविध एटीएम (ATM) सेंटरमधून काढल्याचे दिसून आले. त्यानुसार मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याचे पथक बिहार राज्यात दाखल झाले. संबंधित एटीएमचे CCTV FOOTAGE तपासले असता पोलिसांना अविनाशकुमार उर्फ बिट्टू याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार बिहार शरीफ येथे सापळा लावून पोलिसांनी बिट्टू याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारंची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मुख्य आरोपींच्या प्राप्त मोबाईलच्या तांत्रिक तपासानुसार तसेच प्राप्त गोपनीय माहितीनुसार आरोपी हे दानापूर- सिकंदराबाद या ट्रेन ने सिकंदराबाद येथे जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या ट्रेनचा थांबा नागपूर येथे असल्याने तात्काळ पोलिसांंनी नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी मुकेशकुमार (वय-28 वर्षे) व सौरभकुमार (२५) यांना बेड्या ठोकल्या. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सृष्टी प्रदिपकुमार बर्नावल (वय-२१ वर्ष, रा. जुहू गल्ली, अक्सा मशिदीसमोर, अंधेरी (प.), मुंबई) व संजितकुमार शैलंदर मिस्त्री, (वय-२४ वर्ष) यांना अटक केली.

असे दिल बोगस सिम कार्ड


बनावट सिम कार्ड हे AIRTEL POS AGENT सृष्टी हिने गैरमार्गाने ग्राहकांचे दोनदा BIOMETRIC घेऊन त्याआधारे एक सिमकार्ड ग्राहकास देवुन दुसरे SIM कार्ड स्वतः जवळ ठेवुन त्यानंतर सदरचे सिमकार्ड हे सायबर गुन्हयांकरिता बिहार राज्यात पाठवून देत असल्याने तपासादरम्यान निष्पन्न झाले.

तपास करणारे पोलीस पथक

गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सह योगी पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकिरण काशीद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि जयदीप गायकवाड, सायबर अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अमित देवकर, सायबर अधिकारी, पोलीस उप निरीक्षक रूपेशकुमार भागवत, पोलीस उप निरीक्षक प्रविण रणदिवे, सपोउनि म्हात्रे, हवालदार राठोड, तांडेल, पाटील, सचिन पाटील, अंमलदार ताटे, काकडे, यादव, महिला अंमलदार गुंजाळ, देशमुख यांनी या टोळीची पोलखोल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!