police varata

Be careful while ordering online

Mumbai-Police-news

ऑनलाईन ऑडर करताना सावध राहा

  • राजस्थानच्या पाचवी शिकलेल्या भामट्याने १५ जणांना गंडवले
  • मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने केली गुन्ह्यांची उकल

मुंबई : सध्याच्या स्मार्टनेसच्या युगात आॅनलाईन (Online fraud) व्यवहार करणा-याला मुंबईतील १५ जणांना पाचवी शिकलेल्या एका भामट्याने लाखो रुपयांना गंडवले. या सर्वांनी मुंबईतील एका नामांकित स्वीटच्या दुकानात आॅनलाईन आॅडर केली आणि या आरोपीच्या लुटीच्या जाळ्यात अडकले. या गुन्ह्यांचा उत्तमरित्या तपास करून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील परिमंडळ २ च्या हद्दीतील विशेष पोलीस पथकाने आरोपीला राजस्थानमधून (Action of Mumbai Police in Rajasthan) अटक केली. मुपीद (३१) असे आरोपीचे नाव असून त्याला ८ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ऑनलाईन लाडू बूक करताना फसवणूक

गिरगावातील नामांकित स्वीटच्या दुकानातून ऑनलाईन लाडू बुक ( book online Laddu) करण्यासाठी किशोर (बदललेले नाव) याने गुगलवर दुकानाचा नंबर सर्च केला. त्यावेळी सर्च इंजिनमध्ये प्राप्त झालेल्या वेबसाईटवरील नंबरवर फोन करून लाडू बूक केले. त्यावेळी आॅडर बूक करताना पेमेंट झाले नाही, असे सांगून फोनवर बोलणा-याने जी-पेवरून पुन्हा पेमेंट करण्यास सांगितले आणि चार अंकली नंबरही सांगितला. बोलण्यात गुंतल्याने लाडूसाठी पैसे ट्रान्सफर (Online Transactions) करताना किशोरने चार अंकी नंबर टाकला. तरीही पैसे मिळाले नाही, असे सांगून अनेकदा नंबर टाकून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. यामुळे त्याच्या खातून लाखो रुपये गेले, हे लक्षात येताच त्याने डी. बी. मार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी (गु.र.कं. २९०/२०२३) भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार (Information Technology Act Sections including Sections 419, 420 of the IPC) अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे गिरगावातील अनेकांना गंडवण्यात आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांची त्वरित उकल करण्याच्या सूचना उपायुक्त डॉ. श्री मोहित कुमार गर्ग यांनी दिल्या. त्यासाठी परिमंडळ २ च्या हद्दीतील विशेष पोलिसांचे पथक नेमण्यात आले.

Mumbai police exposed online fraud | राजस्थानमध्ये पोलिसांची कारवाई

या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती तपासली असता आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने झिलपट्टी (तहसील कमान, जि. खण) येथे सापळा लावून आरोपी मुपीदच्या मुसक्या आवळल्या.

या गुन्ह्यांची उकल
या कारवाईमुळे गावदेवी पोलीस (Gadevi Police) ठाण्यात दाखल असलेले ८, मलबार हिलचा (Malabar Hill Police Station) १ तर डी. बी. मार्ग पोलिसांनी नोंद केलेले ५ व अन्य एक असे १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईदरम्यान आरोपीकडून गुन्हे करताना वापरलेले २ मोबाईल, ३ सिमकार्ड, ९ बँकांचे डेबीट कार्ड व पासबुक जप्त केले.

कारवाई करणारे विशेष पथक

ही कारवाई दक्षिण प्रादेशिक विभागाचे डॉ. अभिनव देशमुख (IPS Dr. Abhinav Deshmukh, उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग, गिरगाव विभागाचे एसीपी रवी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनि विनय घोरपडे, जितेंद कदम, नितीन महाडिक, सपोनि तुकाराम डिंगे, विकास शिंदे (सायबर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गावदेवी व पथक), पो.उप. नि अभिजीत देशमुख, अंमलदार सचिन मुगे, सुरज धायगुडे, चैतराम पावरा, तांत्रिक तपास करणारे मुन्ना सिंग यांनी केली.

One thought on “Be careful while ordering online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!