police varata

Attempted murder in Mumbai arrested in Delhi

मानखुर्दमध्ये खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला दिल्लीत ठोकल्या बेड्या
मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ ६ च्या विशेष पथकाची कौतुकास्पद कारवाई

मुंबई : मानखुर्द परिसरात जीवघेणा हल्ला करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी परिमंडळ ६ च्या हद्दीतील विशेष पोलीस पथकाने केली.
काह सराईत आरोपीतांनी जीवे ठार मारण्यचा प्रयत्न केल्या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७,५०४,५०६ (२), ३४ भादविसह कलम ४,२५ शस्त्र अधिनियमसह कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका अन्वये अशपाक खान उर्फ बब्बू, राशीद जग्गा, फैसल सिध्दीकी उर्फ नागौरी व इस्माईल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी केली कारवाई

काही सराईत आरोपीतांनी जीवे ठार मारण्यचा प्रयत्न केल्या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७,५०४,५०६ (२), ३४ भादविसह कलम ४,२५ शस्त्र अधिनियमसह कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका अन्वये अशपाक खान उर्फ बब्बू, राशीद जग्गा, फैसल सिध्दीकी उर्फ नागौरी व इस्माईल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक नेमण्यात आले. या पथकाने आरोपी फैसल उनहुलहक सिध्दीकी उर्फ नागोरी हा अस्तित्व लपविण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्राच्या बाहेर पळाला होता. ही माहिती प्राप्त होताच पोलीस पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. गुजरात, राजस्थानातून फैसल याने दिल्ली गाठली. तेथे उत्तमरित्या सापळा लावून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला मुंबईत आणले असून न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत शिंदे करीत आहेत.

आरोपीचा पोलीस रेकॉर्ड

आरोपी फैसल उनहुलहक सिध्दीकी उर्फ नागोरी हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध जीवघणे हल्ले करणे, धमकी देणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, गृह अतिक्रमण करणे, भेसळ करणे, अपायकारक पदार्थाची विकी करणे व गुटखा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

या विशेष पथकाला सलाम

ही उल्लेखनीय कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, विजयसिंह देशमुख, अजय गोल्हार, अभय काकड, राजू साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश धुमाळ, संतोष कांबळे, हवालदार सुनिल पाटील, प्रमोद लेंभे, समीर पिंजारी, अंमलदार देशमुख, प्रदिप देशमुख यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!