police varata

Assistant Police Inspector Ashok Itkar | मुलीच्या उपचारासाठी सुट्टी घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे हृदयविकाराने निधन

बुधवारी होणार अंत्यसंस्कार

मुंबई : मुलीच्या उपचारासाठी चार दिवस सुट्टीवर असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक रामभाऊ इटकर ( वय५४) (Assistant Police Inspector (ASI) Ashok Rambhau Itkar) यांचे 26 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई वाहतूक शाखेच्या घाटकोपर विभागात कर्तव्य असलेले एएसआय अशोक इटकर हे मुलीला किडनी स्टोन झाल्यामुळे शनिवारपासून सुट्टीवर होते. त्यांच्या मुलीला सोमवारी सायंकाळी डिस्चार्ज मिळाला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कुटुंबीयांनी इटकर यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या निधनाची माहिती काही क्षणात पोलीस खात्यात अनेकांना समजली. आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकार्याचे अचानक जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. विशेषत: घाटकोपर वाहतूक विभागात कर्तव्याला असलेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासाठी धक्कादायक ठरले.

बीडमध्ये होणार अंत्यविधी

इटकर हे मूळचे बीड जिल्ह्यातील कडा आष्टीचे रहिवासी होते. इतर नातेवाईक गावी असल्यामुळे इटकरे यांच्या पार्थिवावर मूळगावी बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती घाटकोपर वाहतूक विभागातील त्यांच्या सहकार्याने दिली.

आतापर्यंत बजावलेले कर्तव्य

कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून ओळख असलेले अशोक इटकर यांनी मुंबईतील भोईवाडा, जे जे मार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले होते. तसेच मुंबई पोलीस दलाचा कणा म्हणून ओळख असलेल्या गुन्हे शाखेत देखील त्यांनी कर्तव्य बजावले होते.

या दुःखातून सावरण्यासाठी इटकर कुटुंबीयांना बळ मी मिळो हीच पोलीस वार्ता टीमकडून प्रार्थना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!