- अंमलदार सुनील निकम, तेजस ठाणेकर यांची कौतुकास्पद कामगिरी
- १४ गुन्ह्यांची उकल, ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : मोटारसायकलवरून सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोन इरणी आरोपींना (Two Iranian accused) गजाआड करण्यात आले. ही कारवाई अंमलदार सुनील निकम, तेजस ठाणेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा घटक ५ च्या (Crime Branch of Thane Police Force) पथकाने केली. आसिफ शब्बीर सैय्यद (वय ६२, रा. पाटीलनगर गल्ली नं. ४, आंबीवली ता. कल्याण जि.ठाणे ), बागर आसिफ सय्यद (वय ३८, रा. भास्कर शाळेचे बाजूला कुरम चाळ आंबीवली ता. कल्याण जि. ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी हाती लागल्याने १४ गुन्ह्यांची उकल झाली असून ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अशी केली कारवाई
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वारंवार सोन्याचा ऐवज चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डंबरे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा ५ च्या पथकानेही तपास सुरू केला. तपासादरम्यान सोनसाखळी चोरणारे ठाण्यातील इंदिरानगर नाका येथे आल्याची माहिती खबऱ्याने अंमलदार सुनील निकम, तेजस ठाणेकर यांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून दोघांनाही ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून १४१ ग्रॅम सोन्याचा ऐवज, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
या गुन्ह्यांची झाली उकल
श्रीनगर – . गु. रजि. नं. १०२/२०२४ (१,६०,०००/ रू) भा.द. वि. कलम ३९४, ३४
गु.रजि.न. . २९/२०२३ भा. दं. वि. कलम ४२०, ३४
चौकी नगर पो. स्टॅ. गु.रजि.न. १९०/२०२२ भा. द. वि. कलम ३९२, ३४
चितळसर – . गु.रजि.न. . १०७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
वागळे पो. स्टॅ. गु.रजि. नं. . ०७/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ (२७,०००/ रु)
वागळे – गु.रजि. नं. . २७/२०२२ (३२,०००/ रू) भा. दं. वि. कलम ३९२, ३४ श्रीनगर पो. स्टॅ. ग. रजि. नं. . २६४/२०२२ (१६,०००/ रु) भा. द. वि. कलम ३९२
वर्तकनगर – गु, रजि.नन. १३१६/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ (३०,०००/ रू)
कापुरबावडी – गु. रजि.न. ११११/२०२२ भा. दं. वि. कलम ३९२, ३४ (३५,०००/ रू)
कापुरबावडी – गु. रजि.न. १२३१/२०२२ भा.दं. वि. कलम ३९२.३४ ११
चितळसर – . गु. रजि. नं. 1113/२०२२ भा. दं. वि. कलम ३९२, ३४ १२ .
गु.र.क्र. ११७१/२०२२ भा. द. वि. कलम ३९२, ३४ १३
गु. रजि. नं. ११७६/२०२२ भा. दं. वि. कलम ३९२, ३४
वागळे इस्टेट – गु.रजि. नं. १२३८/२०१४ भा.दं.वि.कलम ३७९
तपासात या सर्वांचे मोलाचे सहकार्य
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले (Additional Commissioner of Police (Crime) Punjabrao Ugle), पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) निलेश सोनावणे, गुन्हे शाखा घटक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके (Senior Police Inspector Vikas Ghodke), पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, अविनाश महाजन, पोउपनि तुषार माने, पोउपनिर सुनिल अहिरे, पोहवा सुनिल निकम, विजय काटकर, रोहीदास रावते, जगदीश न्हावळदे, सुशांत पालांडे, विजय साबळे, मिनाक्षी मोहीते, पोहवा / माधव वाघचौरे, सुनील रावते, पोना तेजस ठाणेकर, रघुनाथ गार्ड, उत्तम शेळके, यश यादव यांनी केली.